पसायदान बाल भवन अनाथ आश्रमात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !....
पसायदान बाल भवन अनाथ आश्रमात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !....
खडवली येथील पसायदान बाल भवन अनाथ आश्रमात, प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी आश्रम प्रमुख- बबन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते-साईभाई रामपूरकर, संजय इंदप व विधनेश चिपळूणकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
या सोहळ्यात आश्रमातील सर्व मुलांना कपडे, खेळणी व खाऊचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मुलांनी विविध करमणुकीचे कार्यक्रम सादर केले. आश्रमातील शिक्षक व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.