मनसेची लोअरपरळकरांना मदत !
कोरोना महामारी संकटामुळे सर्व वाहतूक बंद असल्या कारणास्तव गॅस एजन्सीकडे कामगारांचा तुटवडा असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरळी विधानसभा सचिव श्री. उत्तम सांडव, रोजगार व स्वयंरोजगार विभाग संघटक व उपचिटणीस मनसे कामगार सेना श्री.पद्मनाभ वाडकर, मनसे रेल्वे कामगार सेना संयुक्त चिटणीस श्री. सुधीर वरखडे, उपशाखा अध्यक्ष श्री.अमोल स. येवले, श्री. निखिल सांडव आणि मनसे कार्यकर्ते यांनी आज खिमजी नागजी चाळ, तुळशी बिल्डिंग, तपोवन बिल्डींग, चिरायु बिल्डींग, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम) येथील रहिवाशांना गॅस सिलेंडर घरपोच करून देण्याची व्यवस्था केली.