मुंबई भायखळा येथे शिवसेनेत बंडखोरीचे संकेत !!

मुंबई भायखळा येथे शिवसेनेत बंडखोरीचे संकेत !!

      शिवसैनिक म्हटलं म्हणजे कट्टर, बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाचे पालन करणारे, ज्या वेळेस एखादे कार्य करायचे असेल तेव्हा बाळासाहेब फक्त आपलं बोट पुढे करायचे आणि सच्चे शिवसैनिक साहेबांच्या आदेशाचं पालन करण्यास तयार होत. इतकं असूनही बाळा साहेबांनी कधीच पदाची अपेक्षा नाही केली. शिवसेनेची सत्ता येऊन सुद्धा स्वतः मुख्यमंत्री न बनता मनोहर जोशी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनविले. संपूर्ण महाराष्ट्र ज्या व्यक्तीच्या एका बोटावर नाचतो अशा बाळासाहेबांनी कधीच पदाची लालसा केली नाही. पाच वर्षे राज्य करण्यापेक्षा चिरकाल महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर अधिराज्य करण्यासाठी पद झुगारून दिल आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनात घर करून राहिले.

          पण उद्धव सरकार पडण्याचं नेमकं कारण काय आहे ? राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हात मिळवणी करुन फक्त मुखमंत्री पद प्राप्त झालं. पवारांच्या इशाऱ्यावर नाचणारे मुख्यमंत्री अशी कुजबुज कानी येत होती. कितीतरी स्वार्थाच्या तव्यावर स्वतःची पोळी भाजून घेणारे सत्तेच्या लालसेपोटी दलबदलू नेत्यानी खुर्ची साठी शिवसेनेत प्रवेश केला, पदाधिकारी झाले. परंतु उद्धव साहेबांच्या लक्षात कस आलं नाही की इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेस हाडाचे शिवसैनिक हे नाराज होत गेले. इतकी वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ राहून फक्त झेंडे पकडण्याशिवाय त्यांच्या नशीबी कधी कोणतंही पद आलं नाही. त्यामुळे सच्च्या शिवसैनिकां मध्ये फूट पडत चालली आहे. त्याचे परिणाम असता फुटा फुटीत दिसून येत आहे.

         मग आता कुठे गेले बाळा साहेबांचे ते रिमोट कंट्रोल कुठे गेले? उद्धव साहेबाना रिमोट कंट्रोल ने काम करण्यास नाही जमल का? काही दिवसांपूर्वी उद्धव यांनी जाहीर केलं होतं की निष्ठावंतांना न्याय देणार अस असताना, मुंबई भायखळा विधान सभेत शिवसेनेने जुन्या कार्यकर्त्यांना पद देण्याऐवजी राष्ट्रवादी, मनसे मधून आलेल्या पुरुष व महिला कार्यकर्त्याना पदं देण्यात आली आहेत.

           विश्वसनीय सूत्रांकडुन माहिती मिळाली की पक्षातील काही निष्ठावंत शिवसैनिक यांना डावलून इतर पक्षातुन आलेल्या कार्यकर्त्याना शिवसेनेत प्रवेश देऊन भायखळा विधानसभेत उपऱ्या कार्यकर्त्यांना पदे देण्यात आली आहेत. त्यामुळे भायखळा विधान सभेत आंतरिक वाद आक्रोश पेटून उठला आहे. पद नियुक्ती करण्याची परवानगी विभाग प्रमुख व महिला संघटिका यांच्या कडे असते. परंतू आम्हाला माहिती मिळाली की भायखळा विधान सभेचे माजी नगरसेवक रमाकांत रहाटे हे कोणतंही पद नसताना पदाधिकारी निवडतात आणि त्यांनी शिवसैनिकांना डावलून नवीन कार्यकारणीची लिस्ट वरिष्ठांना पाठवून नवीन पदं नियुक्ती केली. पण ह्या पदाधिकाऱ्यां मध्ये एकही मूळ शिवसैनिक नाही. 

१) मनोज जामसुतकर (शिवसेना उपनेते) राष्ट्रवादी काँग्रेस नंतर काँग्रेस मधून आता शिवसेनेत आले.

 २) बबन गावकर (भायखळा विधानसभा समन्वयक) गेली ३५ वर्ष बोरीवली येथील रहिवाशी.

३) मंगेश बनसोड (शिवसेना विधानसभा संघटक) काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस नंतर शिवसेनेत दाखल झाले.

४) सुर्यकांत पाटील (शिवसेना विधानसभा सहसंघटक) राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आता शिवसेनेत.

५) रवींद्र चव्हाण (विधानसभा सहसंघटक) नसे मधुन आता शिवसेनेत आले.

६) विजय कामतेकर (शिवसेना उपविभाग प्रमुख) मनसेतून आता शिवसेनेत आले.

 ७) विद्याधर चव्हाण (शाखा संघटक) भुजबळ यांच्या बरोबर काँग्रेस मध्ये जाऊन शिवसेनेत आले.

८) चंदना साळुंखे (शिवसेना म. विधानसभा संघटक) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आता शिवसेनेत दाखल.

९) किर्ती शिंदे (शिवसेना उपविभाग म. संघटक) राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा कोणतेही पद नसताना आता शिवसेनेत मोठे पद.

१०) सोनम जामसुतकर (उपविभाग संघटक) राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आताच्या माजी नगरसेविका शिवसेनेत कधी प्रवेश घेतला अजून शिवसैनिकांना माहीत नाही.  

११) रमेश रावल (क्र. २०८ शाखा प्रमुख) मनसे मधून शिवसेनेत आले. 

१२) अंजना औटी (क्र. २०८ शाखा संघटक) राष्ट्रवादी मधुन शिवसेनेत आल्या.

१३) विनोद शिर्के (क्र. २१२ शाखा प्रमुख) काँग्रेस मधुन शिवसेनेत आले.

           ही वरील प्रमाणे नावे देण्यात आली, तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेणारे, खुर्ची साठी लंपट असलेल्या अश्या दलबदलू कार्यकर्त्याना महत्वाची पदे देण्यात आली आहेत. मग निष्ठावंत शिवसिनिकांच्या पाठीत अजून किती खंजीर खुपसणार आणि  बाहेरून आलेल्या पक्षातून लोकांना पदाची जबाबदारी देऊन बाळा साहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा खून पाडणार का? आता राष्ट्रवादी मनसे शिवसेना शिकवणार का? असे संतप्त उद्गार भायखळाविधान सभेच्या शिवसैनिकाच्या तोंडून निघत आहेत.

           दिलेली पदे रद्द करून निष्ठावतांना न्याय मिळावा अन्यथा महिला कार्यकर्त्या ही बंड करून उठतील व शिवसेनेत शिवसेनेच्याच विरोधात निष्ठावंत शिवसैनिक उभे राहतील.

           उद्धव ठाकरे साहेब आता तरी पक्षात आपसात होणाऱ्या बंडाकडे लक्ष द्या नाहीतर सत्ते प्रमाणे शिवसेनेचे पानिपत होण्यास वेळ लागणार नाही अशी भायखळा विधानसभा कार्यकर्त्यां मध्ये कुजबुज चालू आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week