एक नवीन सिंघम गोरेगाव मालाड विभागासाठी ACP श्री. दिपक फटांगरे !!

एक नवीन सिंघम गोरेगाव मालाड विभागासाठी ACP श्री. दिपक फटांगरे !!

       सिंघम म्हटलं तर आपल्याला आठवतो तो हिंदी चित्रपटातील खाकी गणवेशातील रुबाबदार धडकेबाज गरम डोक्याचा आता माझी सटकली म्हणणारा अजय देवगण आणि तशाच प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. दिपक फटांगरे.

      सद्रक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शिक्षा या पोलीस ब्रीदवाक्याला न्याय देणारे व त्याप्रमाणे वागणारे फटांगरे यांनी अनेक क्लिष्ठ गुन्हे पोलीस तपासातून उघडकीस आणले आहेत. यापूर्वी मालाड पोलीस ठाणे येथे गुन्हे विभागात पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोरेगाव बांगुर नगर पोलीस ठाणे येथे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे.

       फटांगरे यांचे नुसते नाव जरी घेतले तरी गुन्हेगारांना दरदरून घाम फुटला म्हणून समजा, यांची नुकतीच गोरेगाव मालाड विभागासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे, त्यामुळे विभागातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे आढळत आहे.

          त्याप्रसंगी गोरेगाव व मालाड विभागातर्फे श्री. दिपक फटांगरे यांचे स्वागत केले.



Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे