मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर घाणीचे साम्राज्य पीडब्लूडी अधिकार्यांचे दुर्लक्ष !
मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर घाणीचे साम्राज्य पीडब्लूडी अधिकार्यांचे दुर्लक्ष !
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील आझाद मैदाना लगत असलेल्या मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याकडे पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. याच हंसामेंट कंपाऊंडमध्ये मुंबई काँग्रेस कार्यालयात सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गट तसेच खोरीपा पक्ष कार्यालय, जनहित महिला संघटना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय आहे या कार्यालयासमोरील रस्त्यावर असलेले फेवर ब्लॉक उखडलेले असून गटारांची झाकणे ही उखडलेल्या स्थितीत दिसत आहेत. या ठिकाणावरून येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे तर याठिकाणी असलेल्या शौचालया तुन दुर्गंधी येत असल्याने लोक नाकाला रुमाल लावून प्रवास करीत आहेत.
वेळीच या प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंते व शाखा अभियंता श्री. पडळकर यांनी लक्ष द्यावे अन्यथा स्थानिक रहिवाशांच्या वतीने जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.