राज ठाकरे, रामदास आठवले यांच्या सह भाजपच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात !

राज ठाकरे, रामदास आठवले यांच्या सह भाजपच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षेत कपात !

          रिपाई खासदार रामदास आठवले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपातील नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील, आशिष शेलार आदी अनेकांच्या  सुरक्षिततेत कपात करण्यात आली आहे. 

     देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील बुलेट प्रूफ गाडी काढली जाणार आहे तर अमृता फडणवीस, दिव्या फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांत पाटील, नारायण राणे, राम कदम, प्रसाद लाड, शोभाताई फडणवीस, माधव भंडारी यांच्या सुरक्षेतही मोठी कपात करण्यात आलेली आहे...

      नक्षलापासून धोका असलेल्या अंबरीश अत्राम यांचीही सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली असून, राज ठाकरे यांची z सिक्युरिटी काढून y plus एसकोर्ट देण्यात आली आहे

        भाजपच्या अनेक नेत्यांची सुरक्षा कपात केली असली तरी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना नव्याने सुरक्षा देण्यात आली आहे.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने