अशोक चव्हाण यांची हाकालपट्टी करा विनायक मेटे यांची मागणी !
अशोक चव्हाण यांची हाकालपट्टी करा विनायक मेटे यांची मागणी !
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणा संदर्भात बाजू मांडण्यासाठी दिल्लीमध्ये जी बैठक बोलावण्यात आली होती त्यात मराठा नेत्यांना वगळण्यात आलेले असून काँग्रेसचे मंत्री अशोक राव चव्हाण हे मनमानी कारभार करीत असून त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी मंगळवारी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक राव मेटे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू योग्यरीत्या मांडण्यात यावी यासाठी दिल्ली येथे आज सोमवारी एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याचे नेतृत्व काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण हे करीत आहेत त्यांनी या बैठकीला काँग्रेस मधील काही नेत्यांना हाताशी धरून सदरची बैठक घेतली, परंतु खऱ्या अर्थाने या बैठकीला शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायकराव मेटे मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील, आबा पाटील, विनोद पाटील, श्रीराम पिंगळे आदी नेत्यांना या बैठकीला बोलावण्यात आलेले नाही. त्यामुळे सदरच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर पसरलेला आहे.
दरम्यान काँग्रेसची भूमिका ही मराठा विरोधी राहिलेली आहे त्यामुळे आम्हाला अशोक चव्हाण यांच्यावर संशय आहे ते समाजाची भूमिका योग्यरित्या मांडतील की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली आहे.