कोरोनाच्या नावाखाली आंदोलनकर्त्यांची मुस्कटदाबी उद्यापासून आझाद मैदानातील आंदोलने बंद !!

कोरोनाच्या नावाखाली आंदोलनकर्त्यांची मुस्कटदाबी उद्यापासून आझाद मैदानातील आंदोलने बंद !!

               एकीकडे 1 मार्च रोजी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे तर दुसरीकडे सरकार विरोधात आपली व्यथा मांडण्यासाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांना  आंदोलने मोर्चे काढण्यास बंदी घालून एक प्रकारे सरकारने त्यांची मुस्कटदाबी केली आहे.

            एक मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात आपला मुद्दा मांडला जाऊन तो सोडविण्यात यावा यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून  आंदोलनकरते  मुंबईच्या आझाद मैदान येथे येत असतात.

               सध्या शिक्षकांचे आणि परिचालकांचे आंदोलन आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे शासन दरबारी आपल्याला नक्कीच न्याय मिळेल या आशेवर पंधरा दिवसापासून ते आझाद मैदानात बसले होते परंतु अचानक पणे येऊन पोलीस प्रशासनाने त्यांना सांगितले की उद्यापासून आजाद मैदानात बसू नका पोलिसांनी परवानगी नाकारली आहे परवानगी नाकारल्याने आंदोलनकर्त्यांची चिंता वाढली आहे एकीकडे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सरकार चालू ठेवत आहे व आम्हा आंदोलनकर्त्यांची परवानगी कोरोनाचे नाव सांगत परवानगी नाकारत आहेत हा सरकारचा दुजाभाव असल्याचे येथील आंदोलनकर्त्यांनी सांगितले.


                मुंबई पोलीस सह आयुक्त कायदा व सुव्यवस्था श्री विश्वास नागरे पाटील यांनी आझाद मैदानात स्वतः येऊन  आंदोलनकर्त्यांची संवाद साधला व मैदान काही काळ बंद राहील अशी माहिती दिली


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे