मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जयस्वाल होणार का सी.बी.आय.चे संचालक?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जयस्वाल होणार का सी.बी.आय.चे संचालक?

              तीन नावांमध्ये स्पर्धा.......

    देशातील सर्वात मोठी तपास यंत्रणा असणाऱ्या सी.बी.आय.च्या संचालकपदासाठी कोण बसणार याची चर्चा सध्या आहे. 

     पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या उच्चस्तरीय निवड समितीने  तीन नावे निश्चित केली आहेत.

    एस.एस.बी.चे महासंचालक कुमार राजेश चंद्र, गृह मंत्रालयाचे विशेष सचिव व्ही. के कौमुदी आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची नावे निवडण्यात आली आहेत.

      यामध्ये महाराष्ट्राच्या सुबोधकुमार जयस्वाल यांचे नाव पुढे असल्याचे बोलले जात आहे. 

    पंतप्रधान मोदींच्या निवड समितीमध्ये मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रमण आणि काँग्रेसचे लोकसभेचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश होता. 

     अधीर रंजन चौधरी यांनी संचालक पदासाठीच्या निवड प्रक्रियेवर आक्षेप नोंदविला आहे अशी माहिती समोर आली आहे. 

       कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (DoPT- Department of Personnel and Training) ११ मे रोजी समितीच्या सदस्यांना १०९ नावांची यादी पाठविली होती.

     त्यापैकी समितीसमोर १६ सदस्यांची नावे कागदपत्रांसह सादर करण्यात आली.

    त्यातील ३ नावे निवडण्यात आली आहेत. 

यावरच चौधरी यांनी आक्षेप नोंदवला आहे. 

     ९३ जणांची नावे का बाजूला काढण्यात आली असा सवाल त्यांनी केला आहे.

    यादीमधून नावे काढण्याचे काम हे निवड समितीची जबाबदारी आहे,

    डी.ओ.पी.टी.ची नाही असे चौधरी यांनी म्हटले.

 त्यानंतर चौधरी हे समितीच्या बैठकीतून बाहेर पडले.

 मात्र सरकार त्यांच्या मताशी सहमत नसल्याचे दिसत आहे.

 या नावांपैकी काही जण हे यापूर्वीच सेवानिवृत्त झाल्याचे चौधरींनी सांगितले. 

सरकार ही बैठक पुढे ढकलण्यास सहमत नसल्याने चौधरी यांनी या बैठकीवर आक्षेप घेतला आहे. 

त्यानंतर समितीने तीन नावांची निवड केली आहे.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने