महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मागासवर्गीय सुरक्षित नाहीत - लोकप्रतिनिधी आवाज उठवणार काय? मा. आ. उपेंद्र शेंडे !

महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मागासवर्गीय सुरक्षित नाहीत - लोकप्रतिनिधी आवाज उठवणार काय? मा. आ. उपेंद्र शेंडे !

        रिपब्लिकन नेते (नागपूर) राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काही दिवस अगोदर बुलढाणा व लातुर जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जातीच्या कुटुंबावर जातीयवादी लोकांनी जीवे मारेपर्यंत मारहाण केली त्या घटनांमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला नाही, जातीयवादी आरोपींना पाठीशी घातले जात आहे ह्या घटनांपुर्वी आणखी एका प्रकरणात अनुसूचित जातीच्या महिलांना उद्देशून जातीयवादी नराधमाने अश्लील व जातीयवादी शिविगाळ करून धमकी दिली होती ह्या सर्व प्रकारच्या घटनांमध्ये आरोपींना पाठीशी घातले जात आहे, बुलढाणा येथील घटनेनंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अनुसूचित जातीच्या अन्यायग्रस्त कुटुंबातील लोकांना आधार देण्याऐवजी त्यांच्या विरोधात दरोडा टाकला असा गुन्हा दाखल करण्याची चिथावणी दिली आहे, सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधीना हे बेजबाबदार वर्तन शोभून दिसत नाही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गेले दीड वर्ष विशेषतः कोरोनाच्या संकटाच्या काळातही अनुसूचित जाती जमातीच्या समाज घटकांवर जातीयवादी लोकांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील मागासवर्गीय समाजातील लोकप्रतिनिधी ह्या जातीयवादी प्रवृत्तीच्या विरोधात आवाज उठवणार काय असा प्रश्न रिपब्लिकन पक्ष खोरिप चे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्र शेंडे यांनी विचारला आहे. गेल्या वर्षापासून रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सातत्याने मागासवर्गीय समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन केली आहेत मात्र अद्याप राज्य सरकारने जातीयवादी आरोपींवर कारवाई केली नाही त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मागासवर्गीय सुरक्षित नाहीत हे वास्तव आहे त्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या आमदारांनी विधानसभेत ह्या विरोधात आवाज उठवला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे ह्या जातीयवादी प्रवृत्तीच्या विरोधात रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने विधीमंडळ अधिवेशनाच्या काळात सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार असल्याचे रिपब्लिकन पक्ष खोरिप राष्ट्रीय सरचिटणीस माजी प्राचार्य डॉ गोपीचंद मेश्राम यांनी सांगितले आहे.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने