बैलगाडी तुटली, भाई जगताप तूर्तास बचावले !
महागाई आणि पेट्रोल दरवाढ विरोधात आयोजित बैलगाडी मोर्चाची गाडी तुटली.
वाढती महागाई, पेट्रोल दरवाढी विरोधात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली अँटॉपहिल ते बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाई जगताप यांच्या सोबत बैलगाडीवर चढल्याने सदरची बैलगाडी तुटली. सुदैवाने या घटनेत भाई जगताप बचावले पेट्रोल दरवाढ आणि महागाई विरोधात कॉंग्रेस तर्फे आयोजित बैलगाडी मोर्चा मध्ये सायन अँटॉप हिल येथे हा प्रकार घडला.