राज्यात बेरोजगारांची संख्या पाच कोटींच्या वर !
कोरोना काळामध्ये राज्यभरात सुमारे पाच कोटीच्या वर सुशिक्षित तरुण बेरोजगार झालेले आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघ वसंतराव शिंदे सभागृह येथे भारतीय सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत महादेव यादव यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते, सदरच्या पत्रकार परिषदेमध्ये covid-19 या कालावधीमध्ये बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या असून याची संख्या राज्यभरात पाच कोटीच्या घरात पोचली आहे. अशा दोन वर्षांच्या कालावधी मध्ये लोकांना बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे म्हणून सरकारने नोकर भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी या मागणी करता शासन दरबारी आम्ही योग्य तो पाठपुरावा केलेला आहे, ही आमची मागणी शासनाने मंजूर करावी तसेच फेरीवाला धोरण व प्रलंबित घरांचा प्रश्न इत्यादी प्रश्न शासनाने मार्गी लावावेत असे चंद्रकांत यादव यांनी सांगितले.