डॉ. राजेंद्र देवरे यांची मुंबई विद्यापीठाच्या संपर्क अधिकारी पदी नियुक्ती !
डॉ. राजेंद्र देवरे यांची मुंबई विद्यापीठाच्या संपर्क अधिकारी पदी नियुक्ती !
MUST संघटनेचे सदस्य आणि मुंबई विद्यापीठाच्या मॅथेमॅटीक्स विभागाचे प्राध्यापक डॉ . राजेंद्र देवरे सर यांची मुंबई विद्यापीठाच्या संपर्क अधिकारीपदी (Liaison Officer) म्हणून कुलगुरू यांनी नेमणूक केली आहे. त्यांच्या निवडीनंतर सर्व स्तरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या संलग्न महाविद्यालयात अनुसूचित जाती - जमातींच्या आरक्षण धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी डॉ .राजेंद्र देवरे यांना दिली आहे.
महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष संघटनेचे सर्व पदाधिकारी, महासचिव डॉ. शांतज देशभ्रतार, उपाध्यक्ष डॉ. निलेंद्र लोखंडे, उपाध्यक्ष प्रा. शशिकांत माघाडे, खजिनदार डॉ. निर्मला पवार आणि संघटनेचे सल्लागार आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे आदींनी प्रा. डॉ. राजेंद्र देवरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.