वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री !!

वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री !!

       करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे यंदा देखील राज्यभरातील वारकऱ्यांना आषाढी एकादशी निमित्त लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता आलेले नाही. 

      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी सपत्नीक पंढरपूरकडे रवाना झाले.

       दरम्यान, दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन पंढरपूरच्या दिशेने जाताना प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांनी तो टीपला. 

      या पार्श्वभूमीवर व विविध मुद्द्यावरून भा.ज.पा. प्रवक्ते केशव उपाध्येंनी मुख्यमंत्र्यांवर काव्यात्मक टीका केली आहे. 

“जनतेचे जिणे हराम, 

मुख्यमंत्र्यांचे घरातून काम…

पावसाने मुंबईचा चक्का जाम, 

मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम…

एम.पी.एस.सी. विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, 

तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. 

तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला… 

वारकरी भक्तांना बसवुनी घरी, 

फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…” 

अशा शब्दांमध्ये केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.

     मुंबई जलमय झाल्यावरून देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने