सरांनी जातानाही आपला आदर्श समाजासमोर ठेवला !!

सरांनी जातानाही आपला आदर्श समाजासमोर ठेवला !!

       वयाच्या १८ व्या वर्षांपासुन ते आजपर्यंत गेली ४२ वर्षे प्रगती क्लासेसचे संचालक कै. सुनिल बाळकृष्ण परब सर यांनी वरळी बी डी डी चाळ आणि परिसरातील गरीब, गरजु विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्याच्या दृष्टीने त्यांच्या शिक्षणाचा मुलभुत पाया मजबुत करण्याचा जणु ध्यासच घेतला होता त्यांच्या क्लासेसमधून शिकलेले असंख्य विद्यार्थी आज विविध क्षेत्रात महत्वाच्या उच्च पदांवर कार्यरत असून समाजात सन्मानाने जगत आहेत यशस्वी आहेत.

           अशा आदरणीय सुनिल सरांचे गुरुवार दि.१० फेब्रुवारी २०२२ रोजी आकस्मित निधन झाले. दि.२० फेब्रुवारी २०२२ " न्यु गोल्डन क्रिडा मंडळ, रहिवाशी प्रगती क्लासेसचे विद्यार्थी, शिक्षक आणि मित्रमंडळ यांच्यावतीने दोन्ही चाळीतील पटांगणात आपल्या लाडक्या सरांच्या आठवणी, अनुभव आणि कार्याचा आढावा घेऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून, जड अंतःकरणाने त्यांना " भावपुर्ण श्रद्धांजली " वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

               सामाजिक बांधिलकी म्हणुन अनेकांच्या आयुष्यातील अंधार दूर करून त्यांचे जीवन तेजोमय करणाऱ्या कै.सुनिल परब सरांच्या इच्छेनुसार त्यांच्या पत्नी आणि कुटुंबियांनी सरांचे डोळे त्यांच्या इच्छेनुसार दान करून दृष्टिहीन गरजु व्यक्तीला दृष्टी देण्याचे महान कार्य स्वतःच्या कुटुंबापासुन केले. सरांनी जातानाही आपला आदर्श समाजासमोर ठेवला.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे