आमदार यामिनी जाधव यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात लोकांची गर्दी !!

आमदार यामिनी जाधव यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात लोकांची गर्दी !!

      गेल्या काही दिवसापासून आमदार यामिनी जाधव या कर्करोगाने त्रस्त आहेत. त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान काही दिवसापूर्वीच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली होती. यानंतर यामिनी जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधून माझी तब्येत बरी असल्याची माहिती दिली होती. हा फोटो समाज माध्यमांवर वायरल होताच भायखळा विधानसभेतील अनेक नागरिकांनी, हितचिंतकांनी  त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात गर्दी करत आहेत. यामिनी जाधव यांचा भायखळा विधानसभेतील कार्यकर्त्यांशी तसेच सामान्य नागरिकांशी. महिलांशी देखील चांगला जनसंपर्क आहे. तसेच अनेक लोकांच्या अडचणीच्या वेळी धावून जाऊन त्यांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने अनेक नागरिक त्यांची आपुलकीने चौकशी करत आहेत.

       याबाबत आमदार यामिनी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता माझी तब्येत आता बरी असून अजून काही दिवस डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असून नागरिकांचे कोणतेही काम असेल त्यांनी माझ्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा आपले काम नक्की पूर्ण होईल अशी माहिती त्यांनी दिली.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week