दादर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांचे जाहीर आभार !!
दादर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांचे जाहीर आभार !!
दादर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांचे जाहीर आभार, मुंबईतील वरळी कोळीवाड्यातील जुगाराचा अड्डा कायमस्वरूपी बंद !!
मुंबईतील वरळी कोळीवाड्यात जुगार, सट्टेबाजी आणि कटिंगचे अवैध व्यवहार जोरात सुरू आहेत, संध्याकाळी साडेआठ नंतर ते रात्री उशिरापर्यंत गोल्फादेवीच्या पुढे अचानक क्रीडा मंडळ, स्मशानाच्या बाजूला, वरळी कोळीवाडा या ठिकाणी अवैध जुगाराचा अड्डा चालवला जात आहे. यात पणती पातळीसारखे पट रचले जात होते.
स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन नावाचा एक व्यक्ती या अवैध कृत्यांचे खुलेआम सूत्रसंचालन करत होता. स्थानिकांनी मुंबई पोलीस कंट्रोल रूमला याबाबत अनेकदा तक्रारी केल्या होत्या.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या जुगाराच्या अड्ड्यावर संशयास्पद व्यक्तींची सतत ये-जा सुरू होती, अनेक स्थानिक रहिवाशी या जुगाराच्या नादामध्ये कंगाल होऊन व्यसनी झालेले आढळत असत हा जुगाराचा अड्डा खुलेआम राजरोसपणे मोठ्या प्रमाणात चालवला जात होता. चालवणाऱ्यांच्या मनात पोलीस प्रशासनाबद्दल कोणतीही भीती नसल्याचे जाणवत होते, सट्टेबाजीचे व्यवहार चालवले जात होते..
या ठिकाणी लोकांची ये-जा असते, वेगवेगळ्या माध्यमातून, जुगार व सट्टेबाजी केली जात होती.
यामुळे केवळ तरुणांचे भविष्यच उद्ध्वस्त होत नाही, तर वरळी कोळीवाड्यातील परिसरात गुन्हेगारीलाही प्रोत्साहन मिळत आहे. त्यातून चोऱ्यामार्यांचे प्रमाण वाढू शकते.
ही बातमी बातमीकारने दिनांक १८ मे २०२६ रोजी प्रसिद्ध केल्यानंतर त्वरित दादर पोलीस स्टेशन व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी सदरचा जुगाराचा अड्डा कायमस्वरूपी बंद केला, त्यानंतर स्थानिक विभागातून आनंद व्यक्त केला जात आहे व पोलीस यंत्रणेचे आभार व्यक्त केले जात आहेत.