एमडी ड्रग तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त !!
उत्तरप्रदेश हरदोई जिल्ह्यात एमडी ड्रग तयार करण्याचा कारखाना उध्वस्त - गुन्हे प्रकटीकरण कक्ष-४, मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांची मोठी कारवाई !!
नयानगर पोलीस ठाण्यात दाखल असणाऱ्या गुन्ह्याचे पुढील तपासात आरोपी याला उत्तरप्रदेशातून अटक करण्यात आली असून आणखी एक एम.डी. ड्रग तयार करणारी फैक्टरी उध्वस्त करण्यात आली आहे.
आरोपीकडून: १ किलो २६ ग्रॅम MD ड्रग ३०० लिटर केमिकल (MMA) ड्रग तयार करण्याचे लॅब साहित्य जप्त करण्यात आले आहे.
गुन्ह्याच्या तपासात मोठे ड्रग रॅकेट उघड झाले असून आतापर्यंत: २० आरोपी अटक ₹२२.७९ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मि.भा.व.वि. पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरूच राहणार आहे.
सदरची कारवाई मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त श्री निकेत कौशिक पोलीस आयुक्त, श्री दत्तात्रय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, श्री संदीप डोईफोडे उपायुक्त गुन्हे, श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकटीकरण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा ४ प्रभारी पोलीस निरीक्षक श्री प्रमोद बडाख, श्री प्रमोद गांगुर्डे सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री दत्तात्रय सरक सहाय्यक फौजदार, मनोहर तावडे, संदीप मदने पोलीस हवालदार, रवींद्र भालेराव, विजय गायकवाड, प्रवीण राज पवार, शिवाजी पाटील, धनंजय चौधरी, समीर यादव, अश्विन पाटील, हनुमंत सूर्यवंशी, रवींद्र कांबळे संदीप, शेरमाळे, विकास राजपूत, सनी सूर्यवंशी, सचिन चौधरी, संतोष चव्हाण व इतर सायबर सेल यांनी पार पाडली.