दुधात भेसळ करणाऱ्याला दहिसर पोलिसांनी केली अटक !!

दुधात भेसळ करणाऱ्याला दहिसर पोलिसांनी केली अटक !!

     दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक इसम नामांकित दुध कंपन्यांच्या दुधाच्या पिशवीत अस्वच्छ पाणी मिसळून ते भेसळ युक्त दुध नागरीकांना वितरीत करत असले बाबत कक्ष १२, गुन्हे प्रशासन, गुन्हे अन्वेक्शण विभाग मुंबई यांना गोपनिय माहिती मिळाली होती, नमुद भेसळयुक्त दूध हे लहान मुले व नागरीकांच्या आरोग्यास हानीकारक असल्याने सदर बाबत शहानिशा करण्यात आली.


        त्याप्रमाणे दिनांक ०९/०७/२०२६ रोजी पहाटे मिळालेल्या विश्वसनिय माहितीची शहानिशा करून कक्ष-१२ च्या पथकाने अन्न व औषध प्रशासन, बृहन्मुंबई महाराष्ट्र शासन येथील अन्न सुरक्षा अधिकारी यांचेसह आर.एन. ०८८/३९, रूम नंबर बी-३, दुबे चाळ नंबर ०२, राजेश कंपाउंड जयळ दहिसर पूर्व, मुंबई याठिकाणी छापा टाकुन नमुद ठिकाणी नामांकित अमुल गोल्ड, अमुल (ताजा) व गोकुळ कंपन्याच्या मुळ पिशव्या कात्रीने कापून त्या पिशव्यांमधिल दुध काही प्रमाणात बाहेर काढून त्यामध्ये मानवी सेवनास हानीकारक असे अस्वच्छ पाणी मिसळुन, त्या दुधाच्या पिशव्या स्टोव्ह पिन व मेणबत्तीच्या सहाय्याने पुन्हा सिल करुन ते नामांकित कंपन्यांचे प्रमाणित दुध आहे असे भासवुन सामान्य नागरीकांची फसवणुक करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या इसमास भेसळयुक्त दुध भेसळी करीता वापरण्यात आलेल्या साहित्यासह ताब्यात घेतले.


        नमुद इसमाकडे अंदाजे २९,७५०/-रुपये किमंतीचे एकुण ४७० लिटर भेसळयुक्त दुध मिळुन आले ते जागीच नष्ट करण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या नमुद इसमाविरुध्द वर नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कक्ष-१२ चे पोलीस उपनिरीक्षक कोते हे करीत आहे.


       सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त - श्री. देवेन भारती, मा माननीय पोलीस सह आयुक्त (गुन्हे) - श्री अनिल कुंभारे. माननीय अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) - श्री कृष्णकांत उपाध्याय, माननीय पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) - श्री. नवनाथ ढवळे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त (प्र उत्तर) - श्री. रविंद्र अडाणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप येडे-पाटील, पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, पुजा खांडेकर, विजय रासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर मुजावर, युवराज चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक किरण कोते, अजय सावंत, सहाय्यक फौजदार सुनिल चव्हाण, बाळकृष्ण लिम्हण, संतोष राणे, कल्पेश सावंत, पोलीस हवालदार संतोष बने, महिला पोलीस हवालदार समृध्दी गोसावी, शैलेश बिचकर, नितीन पवार, विजय पवार, हरिश्चंद्र भोसले, अर्पिता पडवळ, पोलीस शिपाई चंद्रकांत शिरसाठ, स्वप्नील चंदनशिवे, अरूण धोत्रे यांनी तसेच अन्न सुरक्षा अधिकारी श्री. तुषार पांडुरंग शेळके व पथक यांनी पार पाडलेली आहे.


      अशा प्रकारची माहिती सामाजिक कार्यकर्ते, दक्ष नागरिक यांना मिळाली तर बातमीकारला संपर्क साधावा संबंधित प्रशासन व पोलीस यंत्रणेमार्फत त्यावर कारवाई करण्यात येईल व आपलं नावही गुप्त ठेवण्यात येईल.


       संपर्क - अभिषेक शिंदे 9987676699



Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे