गोरेगाव पूर्व येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न !

गोरेगाव पूर्व येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न !

        मुंबई: गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा परिसरात कै गणपत सखाराम जाधव व कै नंदा गणपत जाधव स्मरणार्थ, निवारा विद्यालय, नागरी निवारा परिषद, येथे राजन गुणाजी मोरे व विकास कांबळे यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आले होते. 

       शिबिराचे उद्घाटन, बृहन्मुंबई महानगर पालिकेचे, मा. उपमहापौर-सुहास वाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी दक्षिण मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष- किशोर त्रिपत, संबोधी चॅरिटेबल ट्रस्टचे-राजेश जेकटे, वॉर्ड क्र ४० चे शिवसेना उपशाखा प्रमुख- अरुण साटम, जनकल्याण सहकारी बँकेचे कार्यकारी सचिव- भार्गव घारगळकर, कॉम्रेड- अनंत गुणाजी मोरे (ताम्हाणेकर ), मनसे विभाग क्र १५८ चे शाखा प्रमुख- दत्ता पटकारे, ऍड. प्रकाश वीर, किशोरकुमार सूर्यवंशी, निरंजन यादव व ज्येष्ठ पत्रकार बाळ पंडित उपस्थित होते.

       डॉ. मनिषा उपाध्ये व त्यांच्या सहकारी यांच्या मार्गदर्शना खाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरास प्रशांत गायकवाड, यांचे विशेष सहकार्य लाभले.

      गोरेगाव पूर्व परिसरातील संकल्प सोसायटी, नागरी निवारा, पिंपरी पाडा, खडक पाडा, संतोष नगर व गोकुळ धाम परिसरातील असंख्य  छोट्या मुलांनी, तरुण व ज्येष्ठ यांनी डोळ्यांची तपासणी करून घेतली. 

        उपस्थित अतिथीनी आयोजकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week