हिंदू देवतेचे मंदिर तोडले प्रकरणी संभाजी सैनिक मंत्रालयात २२ ऑगस्टला आत्मदहन करणार...
बोरिवली गोराई येथील पॅगोडाचे विश्वस्त मंडळ अनुक्रमे सर्वश्री १) नारायण शहा २) विमलचंद सुराणा ३) महासुख खंधार ४) शशिकांत संघवी ५) प्रीती डेंधिया ६) दुर्गेश शहा ७) वल्लभ भन्साली ८) बीमल केडिया ९) दिगंबर धांडे १०) कमलेश विकमसेय ११) योगेश अग्रवाल १२) प्रकाश सराओगी १३) प्रेम कुमार मोदी १४ ) मनोज बोतद्रा १५) लोकेश गोयंका यांनी संगनमत करून नवीन इमारत बांधण्यासाठी हिंदू देवता स्वयंभू वांगणा देवीचे मंदिर दि. १४ मे २०२३ संभाजी महाराज जयंती दिवशीच अगदी मोगली पद्धतीने तोडून फोडून उध्वस्त केले आहे तरी त्या ठिकाणी वांगणा देवीचे भव्य मंदिर बांधून प्राणप्रतिष्ठापना करून सर्व हिंदू समाज बांधवांसाठी दर्शनासाठी खुले व्हावे. तसेच वरील संचालक विश्वस्त मंडळांने संगनमत करून हिंदू देवतेचे मंदिर उद्ध्वस्त करून खूप मोठा गुन्हा केला आहे.
तसेच समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत तरी त्या संबंधित सर्वांना २१ ऑगस्ट पर्यंत अटक करून कारवाई करावी. अन्यथा २२ ऑगस्ट २०२३ मंगळवार रोजी संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ आणि असंख्य संभाजी सैनिक मंत्रालयाच्या आवारात आत्मदहन करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.