पारशीवाडी मित्र मंडळाचे ५१ वे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

पारशीवाडी मित्र मंडळाचे ५१ वे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न !

         मुंबई: चिंचपोकळी पश्चिम येथील पारशीवाडी मित्र मंडळ, मागील ५० वर्षे ज्ञान-क्रीडा), कला-सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. गिरण गावात पारशीवाडी मित्र मंडळ, गणेशोत्सवा साठी प्रसिद्ध असून असंख्य पारितोषिकाचा मानकरी आहे.

        मंडळाचे हे ५१ वे वर्ष आहे. मंडळाचे आजी-माजी सर्व पदाधिकारी, सभासद, सल्लागार, जाहिरातदार व देणगीदार यांचे स्नेहसंमेलन नुकतेच भायखळा पूर्व येथील, सावतामाळी सभागृहात उत्साहात संपन्न झाले. 

          मंडळाचे माजी अध्यक्ष - अरुण सावंत यांच्या पत्नी - अरुणा सावंत, जनार्दन देसाई, बाळ पंडित व रवींद्र रेवडेकर यांच्या हस्ते श्री गणेश, छ. शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिपप्रजवलन करण्यात आले. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष - अमित नाटेकर, सचिव - अतुल देसाई, कार्याध्यक्ष - अजित चाळके व कोषाध्यक्ष - दीपक सागवेकर उपस्थित होते.

      उपस्थितांना बाळ पंडित, भास्कर साळुंके, रवींद्र  रेवडेकर, मंगेश चव्हाण, भाई सावंत, सुनील साळवी, भाई राजेशिर्के, कुंदबाला पांचाळ-शिपोस्कर, अभिलाषा अरुण सावंत, गजानन रेवडेकर, जगन्नाथ पांचाळ आदींनी मार्गदर्शन केले. 

         गौरव चव्हाण यांच्या संकल्पनेने आर्थर रोड चा राजा रेखाचित्राचे अनावरण, सन २०२३ च्या पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रस्तावना व सूत्र संचालन - संतोष परब व आभार अजित चाळके यांनी मानले. संमेलनाची सांगता प्रमोद पालव यांनी महाराष्ट्र गीताने  झाली.

       ह्या संमेलनास श्री स्वामी समर्थ कट्टा परिवार, संतोषी माता मंदिर, सुभाष नगर इस्टेट, अथर्व सोसायटी, ओम साई सदन चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week