
सोलापूर जनजीवन योजनेतील घोटाळा प्रकरणातील दोषींवर कारवाई करा !!
सोलापूर जनजीवन योजनेतील घोटाळा प्रकरणातील दोषींवर कारवाई करा !!
सांगोल्याचे नेते व उपोषण करते राजाराम काळेबाग यांची मागणी !
सोलापूर ग्रामीण पाणीपुरवठा अंतर्गत सांगोला ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग सांगोला यांच्यामार्फत जलजीवन कामाचे कार्यारंभ आदेश शासकीय नोकरीत असताना यांत्रिकी अभियंता अमर कांबळे यांच्या नावावर काढणाऱ्या जलजीवन घोटाळ्याचे मास्टर माईंड उपअभियंता सुरेश कमळे यांना निलंबित करावे अशी मागणी सांगोल्याचे नेते व उपोषणकरते राजाराम काळेबाग यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आझाद मैदानात 12.07. 2023 रोजी उपोषण देखील केले होते. यावर शासनाने पंधरा दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. यामध्ये पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार टेंडर प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमित केल्याप्रकरणी कार्यकारी अभियंते दीपक कोळी व उपकार्यकारी अभियंता कटकधोंड दोषी आढळले. त्यांची विभागीय चौकशी सुरू झालेली आहे. तसेच या प्रकरणात 2 लिपिक निलंबित करण्यात आले आहेत. उपवनसंरक्षक सोलापूर अंतर्गत सांगोला, पंढरपूर, बार्शी या रेंज मार्फत कामे न करता बोगस वाउचर काढून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. मजुरांमार्फत केले जाणारे कामे मशीन व यंत्रामार्फत करून एमबी रेकॉर्ड मजुरांचे कामे केल्याचे दाखवून कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे.
या प्रकरणी वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. चौकशी अधिकारी भ्रष्टाचाराचे आरोप असणारे असल्याने या प्रकरणी ते संबंधितांना पाठीशी घालत असल्याचे राजाराम काळेबाग यांचे म्हणणे आहे.