ICC मेन्स चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ !!
भारत-पाकिस्तान सामन्याचा जल्लोष, कॅप्टन कूल धोनी देखील उत्साहित !!
मुंबई, १० फेब्रुवारी २०२५: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिज्नी+ हॉटस्टार, जे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अधिकृत प्रसारक आहेत, त्यांनी ICC मेन्स चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठीच्या नवीन प्रमोशन मोहिमेचा अनावरण केला आहे. यामध्ये सर्वात जास्त उत्सुकता लागलेल्या सामन्याला – भारत विरुद्ध पाकिस्तान – विशेष महत्त्व देण्यात आले आहे.
या टूर्नामेंटच्या स्पर्धात्मक स्वरूपामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो आणि भारत-पाकिस्तानचा सामना तर नेहमीच क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असतो.
स्टार स्पोर्ट्सच्या या नव्या प्रमोशनल व्हिडिओमध्ये महेंद्रसिंग धोनी एका मजेशीर भूमिकेत दिसत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आजवर झालेल्या ऐतिहासिक लढतींची आठवण करून देत, चाहत्यांच्या उत्साहाला अधिक उधाण आणण्याचा हा प्रयत्न आहे.
प्रमो व्हिडिओची झलक:
व्हिडिओची सुरुवात धोनी एका योगा स्टुडिओमध्ये चाहत्यांना प्रशिक्षण देत असल्याने होते. सुरुवातीला शांत असलेले हे चाहते लवकरच उत्साहाने भरून जातात आणि सामना जवळ आल्याचा जल्लोष सुरू होतो. हातात फलक, ढोल आणि टीमचे कटआउट्स घेऊन ते घोषणा देऊ लागतात. धोनी देखील त्यांच्यासोबत उत्साहात सामील होतो आणि म्हणतो –
✅ माचिस की तिली, शमी उडावो बाबर की गिल्ली!
✅ आसमान में छाएगा, कोहली रऊफ के छक्के छुडाएगा!
✅ एक, दो, तीन, चार, हिटमॅन शाहीन को चौका मार!
✅ आसमान में कितने तारे? टूटेंगे टीवी उनके सारे!
✅ अपना नंबर अगला है, २०१७ का लेना बदला है!
या जाहिरातीचा शेवट धोनीच्या एका हटके संवादाने होतो – "आता आली ना फिल, भारत-पाकिस्तान वाली?"
धोनी म्हणतो:
"भारत विरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेटमधील सर्वात मोठा सामना आहे आणि याचा रोमांच काही वेगळाच असतो. हा प्रमो शूट करतानाही मला खूप मजा आली कारण चाहते ज्या जोशाने हा सामना अनुभवतात, तोच अनुभव आम्हाला सेटवर आला. जेव्हा सामना एवढा महत्त्वाचा असतो, तेव्हा शांत राहणं कठीण असतं ! हा सामना खास असणार आहे आणि मला चाहत्यांनी हा थरार अनुभवताना पाहायला आवडेल !
भारताचा सामना वेळापत्रक:
२० फेब्रुवारी: भारत विरुद्ध बांगलादेश
२३ फेब्रुवारी: भारत विरुद्ध पाकिस्तान
२ मार्च: भारत विरुद्ध न्यूझीलंड
_ICC मेन्स चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा थरार लाईव्ह पाहा - फक्त स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिज्नी+ हॉटस्टार वर, १९ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२५ पर्यंत !!