अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट व मनपा पी विभाग आयोजित पर्यावरण दिन उत्साहात संपन्न !!

अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट व मनपा पी विभाग आयोजित पर्यावरण दिन उत्साहात संपन्न !!

     मुंबई : वृक्षारोपण आणि झाडांचे संवर्धन केलेच पाहिजे, तरच आपण प्रदूषण युक्त वातावरणातून बाहेर पडून वृक्षांच्या सानिध्यात मोकळा स्वास घेऊ शकतो. या हेतूने अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट व मनपा पी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिनानिमित्त गोरेगाव पूर्व येथील रहेजा गार्डन येथे वृक्षारोपण सोहळा आयोजित केला होता.

             या कार्यक्रमात अंध बांधव व ज्येष्ठ नागरिकांनी वृक्षारोपण करून निसर्गाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.

 एक पेड माँ के नाम, या संकल्पनेतून झाडें लावा, झाडें जगवा, हा उपक्रम राबविण्यात आला.

         अनिर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट च्या संचालिका - अंजली सरकाळे, ट्रस्टी सचिन सरकाळे, अध्यक्षा - अश्विनी बोरगावकर, समाज सेवक - संतोष रहाटे, अनंत दाभोळकर, सिने कलाकार संदीप फाटक, उपस्थित होते.

        अंध बाधवानी स्वतःच्या हाताने झाडे लावण्याचा आनंद घेऊन स्पर्श ज्ञानाच्या मदतीने त्यांनी रोपांची माहिती करून घेतली. त्यांच्या चेह-यावरील समाधान आणि उत्साह उल्लेखनीय होता, उपस्थितानाही खूप आनंद झाला.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week