
श्री. पंत महाराज पालखीचे स्वामी कट्टा मठात भव्य स्वागत.
श्री. पंत महाराज पालखीचे स्वामी कट्टा मठात भव्य स्वागत.
मुंबई : दत्त जयंती निमित्ताने, बाळेकुंद्री येथील सदगुरु श्री. श्रीपंत महाराज पालखी रवि दि.१५ डिसेंबर रोजी करिरोड शिवकृपा इमारत ते अपोलो मिल दत्त मंदीर परिसरात काढण्यात आली. आर्थर रोड येथील, श्री. स्वामी कट्टा परिवारांच्या वतीने, स्वामींच्या मठात, कट्टा परिवाराचे अध्यक्ष-बाळ पंडित, चिटणीस-राजेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष-विनोद साळुंखे, व अन्य पदाधिका-यांनी पालखीचे भव्य स्वागत केले. पालखी सेवे करांनी, भजन करून स्वामी समर्थाचे आशीर्वाद घेतले. पालखीचे आयोजन, श्री. पंत भक्त मंडळ मुंबई यांनी केले होते. यात श्री. पंत भक्त - सदाशिव भोसले, दत्तात्रय सातोसे, मुकुंद निकम, देवदास पाटील, भीमराव तिप्पे , संजय हातजर, मधुकर भाईंगडे आणि असंख्य पंत भक्त सहभागी झाले होते.