प्रतिभाताई मतकरी यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार !

प्रतिभाताई मतकरी यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार !

मुंबई : सावली प्रतिष्ठान यांच्या वतीने दर वर्षी कला, क्रीडा, साहित्य , व सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या महिलेला "सावित्रीबाई फुले" पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा हा पुरस्कार जेष्ठ लेखिका नाटककार अभिनेत्री प्रतिभाताई रत्नाकर मतकरी यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

सावली प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेचा १० वा वर्धापन दिन नुकताच दामोदर हॉल परेल येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला, सौ. प्रतिभाताई रत्नाकर मतकरी, यांना "सावित्रीबाई फुले पुरस्कार" जेष्ठ नाटककार सुरेश खरे, दै. पुण्यनगरी च्या संपादिका राही भिडे यांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला. अतिथी म्हणून, मराठी ग्रंथ संग्रहालय (दादर-नायगाव) कार्यवाह - डॉ. कृष्ण नाईक, नाटककार रत्नाकर मतकरी, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे माजी विश्वस्त- धनंजय बरदाडे, राजूभाई गुप्ता, डी एच फायनान्स चे प्रभाकर नकाशे, शैलैश कसबे, संस्थेचे सल्लागार - राज जैतपाल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्स्थित होते.

या सोहळ्यात भार्गव दुधाने, सिद्धिविनायक न्यासाचे माजी विश्वस्थ - धनंजय बारदाडे, पत्रकार - बाळ पंडित, पूर्व भायखळा शाळेचे शिक्षक/शिक्षिका - शालीनाथ ढगे रेखा सोहनी, वर्षा खानोलकर श्यामकांत परांजपे आदींचा विशेष सत्कार करण्यात आला. लकी ड्रॉ मध्ये सचिन घनवट, दिनेश तळगावकर व अनिल शिरवाडकर या विजयी रसिक प्रेक्षकांना पारितोषिके देण्यात आली. 

या सोहळ्यात सुमित्रा निर्मित-स्वरगंध ' गुरू परमात्मा परशु !' हा कार्यक्रम, संस्थेच्या संस्थापक/अध्यक्षा- अरुणा जैतपाळ यांनी सादर केला. लालबाग, परळ, भायखळा, आर्थर रोड, लोअर परेल विभागातील असंख्य ज्येष्ठ नागरिकानी व संगीत प्रेमी रसिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. सूत्रसंचालन-आनंद खेडकर व प्रस्तावना - अरुणा जैतपाळ यांनी केली.




Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week