डॉ मयुरी शिंदे यांच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

डॉ मयुरी शिंदे यांच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

      सम्राट शेअर आणि केअर असोसिएशनच्या वतीने डॉ मयुरी शिंदे आणि समाजसेवक संतोष शिंदे यांनी नुकतेच सातरस्ता येथील रसूल जिवा कंपाऊंड येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. त्यास विभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात विभागातील विभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या आरोग्याची तपासणी करून मोफत औषधाचा लाभ घेतला. या शिबिरात हाडातील कॅल्शियमची कमतरता, मधुमेह, रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता या सारख्या विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. या शिबिराचे उद्घाटन बहुजन जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी केले.या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष बंड्याभाऊ गांगण, वॉर्ड अध्यक्ष अमित शिरसोनकर, विभागातील अनेक मंडळे, सामाजिक संस्था आणि मान्यवर मंडळींनी भेट देऊन डॉ मयुरी शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले.

       आम्ही समाजात अनेक सामाजिक आणि विधायक कार्य घेत असतो. आत्ताच आम्ही विभागातील नागरीकांसाठी मोफत लसीकरण शिबीर आणि मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते. यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारचे सामाजिक कार्य आणि खेळाडूंसाठी क्रिकेटच्या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ मयुरी शिंदे आणि समाजसेवक संतोष शिंदे यांनी दिली.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week