अंधेरी येथे दैवज्ञ चषक क्रिकेट स्पर्धा !!

अंधेरी येथे दैवज्ञ चषक क्रिकेट स्पर्धा !!

       अंधेरी दैवज्ञ समाज आणि गुरुकृपा हॉट फाउंडेशनच्या वतीने रविवारी १९ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय दैवज्ञ चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

    अंधेरी दैवज्ञ चषक क्रिकेट स्पर्धा रविवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत अंधेरी पूर्व येथील नेल्कोजवळील होली फॅमिली हायस्कूल ग्राउंडवर रंगणार आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेत दैवज्ञ ज्ञातीबांधव असलेले खेळाडू आपले क्रिकेटचे कसब दाखवणार आहेत. प्रथम पारितोषिक २१ हजार व भव्य चषक, द्वितीय पारितोषिक १५ हजार व भव्य चषक, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूला २ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

       प्रसिद्ध गायक संगीतकार अनु मलिक, दैवज्ञ समाजश्रेष्ठी दिनकर बायकेरीकर, अ.भा. दैसपचे उपाध्यक्ष आनंद पेडणेकर, रवींद्र माहिमकर, आमदार रवींद्र वायकर, रमेश लटके, अभिनेते अरुण मोहरे, अभिनेत्री शीतल क्षीरसागर यांच्या हस्ते विजेते संघ व खेळाडूंना गौरविण्यात येणार असल्याची माहिती अंधेरी दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष गजानन रत्नपारखी यांनी दिली.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week