हळदी कुंकू समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

हळदी कुंकू समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

       कै समाजसेविका नम्रता दिलीप वागस्कर यांच्या स्मरणार्थ घोडपदेव, राणीबाग या ठिकाणी भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाचे आयोजन ज्येष्ठ समाजसेवक दिलीप वागस्कर यांच्या मार्फत करण्यात आले. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भायखळा विधानसभेच्या कार्यवीर आमदार यामिनी जाधव उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते या महिलांना हळदीकुंकू कडून त्यांचा सन्मान करण्यात आला या समारंभात भायखळा विधानसभेच्या विभागातील दोन हजार महिलांनी सहभाग घेतला होता हा समारंभ अगदी उत्साहपूर्वक आणि जल्लोषात पार पडला. आम्ही दरवर्षी यामध्ये मोठ्या संख्येने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करत असतो या वर्षी देखील आम्ही हे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे, महिलांना त्यांच्या माध्यमातून त्यांना त्यांचा मान मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असून यापुढे देखील आम्ही असेच सामाजिक आणि विधायक कार्य करत राहू अशी माहिती समाजसेवक दिलीप वागस्कर यांनी दिली.


Batmikar
मुंबई प्रतिनिधी - केतन खेडेकर

Most Popular News of this Week