संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यावर कोर्टात केस दाखल हेमंत पाटील यांची माहिती !!

संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यावर कोर्टात केस दाखल हेमंत पाटील यांची माहिती !!

        शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपा नेते किरीट सोमय्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून जनतेची दिशाभूल करीत असून यांच्या दोघांपासून जनतेला कुठलाही प्रकारचा फायदा होत नाही त्यामुळे या दोघांविरोधात मी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे तर इडी कडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दिली. महाविकास आघाडी सरकार मधील शिवसेना नेते व खासदार संजय राऊत व भाजपा नेते किरीट सोमय्या हे सध्या प्रसारमाध्यमांवर एकमेकांविरोधात बोलत आहेत. एकीकडे जनता करोनामुळे हैराण परेशान झाली आहे. तर टीव्हीवर वारंवार या दोघांची वृत्त दाखवली जात आहेत. त्यामुळे विनाकारण लोकांचा ब्रेन हॅमरेज होत आहे. याविरोधात शुक्रवारी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे, असे हेमंत पाटील यांनी सांगितले.


Batmikar
मुख्य वार्ताहर - रवींद्र भोजने

Most Popular News of this Week