
म्हेवण्या सोबत स्वतःच्याच घरात चोरी करणाऱ्या मुलास अटक !!
म्हेवण्या सोबत स्वतःच्याच घरात चोरी करणाऱ्या मुलास अटक !!
९,०६,००० रुपये किमतीचा मुद्दे माल हस्तगत !!
वालीव पोलीस ठाणे हद्दीत दि.१८ नोव्हेंबर २१ रोजी सायंकाळी ७ ते दि.१ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजतचे दरम्यान फिर्यादी यांच्या एव्हरशाईन नगरी, वालीव वसई पूर्व येथील घराच्या दरवाज्याचे लँच मास्टर चावीने उघडून कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यावाटे घरात प्रवेश करून एकूण १२,०६,००० किंमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला होता. त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरून वालीव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शना प्रमाणे फिर्यादी यांच्या घरातील सर्व व्यक्तीकडे विचारपूस केली असता चौकशीत समजून आले की फिर्यादी यांच्या व्यतिरिक्त घराच्या अजून तीन वेगवेगळ्या चाव्या बनविण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक चावी फिर्यादीचा मुलगा हा त्याच्या पत्नीसह एकत्र राहत असताना घरातून गहाळ झाली होती. तसेच सदर अपराध हा बनावट चावीने दरवाजा उघडून त्यावाटे घरात प्रवेश करून झालेला असल्याने फिर्यादी चा मुलगा आमीर उर्फ मोहंमदी वैहिदुल खान याच्याकडे चौकशी करण्यात आली असता, हा अपराध त्याचा मेव्हणा इर्षाद यार मोहम्मद खाचे ह्याच्या सोबत आपसात संगनमत करून केल्याची कबुली त्याने दिल्याने सदर आरोपींना गुन्ह्यात अटक करून त्यांच्या कडून एकूण ९ लाख सहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त संजय कुमार पाटील, सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट ( तुळींज विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे, वालीव पोलीस ठाणे, राहुलकुमार पाटील पोलीस निरीक्षक (गुन्हे) स पो नि, ज्ञानेश फडतरे, पोहवा मनोज मोरे, मुकेश पवार, पोना किरण म्हात्रे, राजेंद्र फड, सतीश गांगुर्डे, पो,अंम जयवंत खांडवी, गजानन गरीबे, सूर्यकांत मुंडे यांनी चौकस पणे पार केली आहे.