विरार पोलिसांची यशस्वी कामगिरी !!

विरार पोलिसांची यशस्वी कामगिरी !!

    घरफोडी व चोरी करणाऱ्या सराईत आरोपितांना अटक करून एकूण ११ गुन्हे आणून ५,७०,५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत !

          आजकाल इझी मनी मिळवण्यासाठी बेरोजगार तरुण वर्ग घरफोडी, चोरी करणे यात अधिक दिसुन येतात. वीस, तीस वर्षाची मुलं चोरी करण्यात अग्रेसर दिसून येतात. योग्य शिक्षण नसणे चांगली नोकरी अथवा कामधंदा नसणे, परंतु हौशी, मौजी खूप आणि त्या पूर्ण करण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे चोरी करणे यात त्या तरुणांना काहीच वावग वाटत नाही आणि हाच तरुण वर्ग हळू हळू सराईत चोरटे बनतात.

       दिनांक ११ मार्च ०२२ रोजी रात्री ११ च्या सुमारास ते १२ मार्च रोजी सकाळी ८ वाजे दरम्यान फिर्यादी यांच्या गोचरपाडा येथील कंपनीच्या गाळ्याचे बंद शटर उचकटून त्यामध्ये असलेले ४,५०,०००/- किमतीचे लोखंडी डाय आणि प्लेट्स कुणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून नेल्याबाबत फिर्यादी यांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. दिलेल्या फिर्यादी वरून विरार पोलीस ठाणे येथे भारतीय विधान दंड विधान कलम ४५४, ४५७, ,३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

         सदरच्या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान गुन्ह्याच्या घटनास्थळावरून प्राप्त झालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर तसेच आरोपींची गुन्हा करण्याची कार्यपद्धती आणि बातमीदाराने दिलेल्या गुप्त माहिती वरून पहिला आरोपी सजन बबन काकडे, वय वर्ष २२, चंदनसार रोड, विरार पूर्व, ता. वसई, जि. पालघर, दुसरा आरोपी शंकर हाल्या दिवा, वय वर्ष, ३६, रा. कातकरी पाडा विरार पुर्व, ता. वसई जिल्हा पालघर, तिसरा आरोपी त्रैलोकी दिनानाथ भगत. ३२ वर्ष कातकरी पाडा विरार पूर्व, ता. वसई, जि. पालघर यांना दिनांक, २७ मार्च रोजी कातकरी पाडा विरार येथून अटक करण्यात आली,.

          आरोपितांकडे ०५,७०,५००/ रुपये किमतीचे लोखंडी, मेटलडाय आणि क्लिप, लोखंडी प्लेट, पितळेची मूर्ती, मोबाईल फोन, गाडीचे टायर इ. असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपितांना दिनांक १ एप्रिल ०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

          अटक केलेले आरोपी हे स्क्रू ड्रायव्हरच्या साहाय्याने बंद शटरचे कडी कोयंडा, उचकटून त्यामधले  लोखंडी/मेटलचे डाय आणि क्लिप चोरी करणे उघड्या घरामध्ये प्रवेश करून मोबाईल, रोख रक्कम चोरणे, रस्त्यावर उभ्या केलेल्या गाड्यांचे टायर चोरी करणे मंदिरातील दान पेटी, मुर्त्या, चोरी करणे, त्यासाठी दिवसा रेकी करून रिक्षातून येऊन चोरी करणे ह्या पद्धतीने आरोपी चोरीस अंजाम देत होते. 

          सदर आरोपितांवर विरार पोलीस ठाण्यात एकूण ११ गुन्हे उघडकीस आले आहेत.

          सदर ची कामगिरी श्री प्रशांत वाघुडे पोलीस उप आयुक्त, श्री. रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुरेश वराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दिलीप राख पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उप निरीक्षक अभिजित टेलर, संदेश  राणे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, पोलीस नाईक हर्षद चव्हाण, संदिप शेरमाळे, पोलीस शिपाई इंद्रनील पाटील, विशाल लोहार, रवी वानखेडे, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे आणि सागर घुगरकर यांनी यशस्वी  रित्या पार केली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week