बदन को राहत ! लेडीज मसाज पार्लर ? मग कारवाई नक्कीच !

बदन को राहत ! लेडीज मसाज पार्लर ? मग कारवाई नक्कीच !

     मसाज व एक्स्ट्रा सर्व्हिसच्या नावाखाली अश्लील कृत्य करणाऱ्या स्पावरती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांची कारवाई !

         हल्ली लेडीज मसाज पार्लर म्हणजे आंबट शौकीन पुरुषांचे शौक झाले. लेडीज पार्लर मध्ये जाऊन मसाज करून घेणे आणि मग शरीराची भूक भागवणे पैसा खर्च करणे ह्यात शान मानतात. म्हणुन लेडीज मसाज पार्लर मध्ये काम करणाऱ्या मुली व मालक हा धंदा जास्त पैसे कमविण्यासाठी सर्रास पुढे सरसावत आहेत. अश्याच एका लेडीज मसाज पार्लरची घटना उघडकीस आली.

          दिनांक ११ फेब्रुवारी रोजी अनैतिक मानवी प्रतिबंधकक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री एस.एस. पाटील यांना त्यांच्या गुप्त बामीदारकडून माहिती मिळाली की " ले सेरेन स्पा" (फँमिली सलूनआणि स्पा) अजित पेलेस जवळ, पेणकरपाडा, काशीमीरा या पार्लर मध्ये येणाऱ्या गिऱ्हाईकाकडून मसाज व एक्स्ट्रा सर्व्हिसच्या (अतिरिक्त सेवा) नावाखाली जास्त पैसे घेऊन मुली गिऱ्हाईकाशी अश्लील चाळे करीत असून, सदर मुली करीत असलेल्या कृत्यास स्पाचे चालक/ व्यवस्थापक प्रोत्साहित करीत आहेत.

          मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस श्री पाटील यांनी बोगस गिऱ्हाईक व पंच यांना "ले सेरेन स्पा" मध्ये  पाठवुन सत्यता पडताळून पहिली पोलीस पथका सह छापा टाकला असता स्पा मध्ये एक महिला बोगस गिऱ्हाईकाशी अश्लील चाळे करीत असताना रंगेहात पकडली गेली. तसेच स्पा मध्ये काम करणारा छोटू कुमार पासवान वय वर्ष २२ वर्ष व चालक मुमताज खान  वय ३७ वर्ष यांनी आपसात संगनमत करून बोगस गिऱ्हाईकास दोन महिलांना दाखवले आणि मसाज आणि एक्स्ट्रा सर्व्हिस च्या नावाखाली दोन हजार रुपये स्वीकारले व एका महिलेस बोगस गिऱ्हाईका सोबत पाठवुन सदर च्या कृत्यास प्रोत्साहित करतात हे दिसून आल्याने छोटू पासवान आणि मुमताज खान व इतर  दोन महिलांना तसेच बोगस गिऱ्हायकाकडुन स्वीकारलेली रक्कम व कँश काऊंटर मधून जप्त केलेली ३१३०/- रुपये सह ताब्यात घेण्यात आले.

          सदर बाबत महिला पोलीस अंमलदार सुप्रिया नथु तिवले नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांनी दिलेल्या फर्यादी वरून काशीमीरा येथे भारतीय दंड विधान कलम २९४,१४४,३४  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

          सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त डॉ महेश पाटील (गुन्हे), सहा पोलीस आयुक्त श्री अमोल मांडवे (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील, पोलीस हवालदार उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, महिला पोलीस नाईक वैष्णवी यंबर, महिला पोलीस शिपाई सुप्रिया तिवले यांनी यशस्वी केली.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी

Most Popular News of this Week