शोभाबाईंचे कर्तृत्व उर्जादायी आणि मार्गदर्शक !!

शोभाबाईंचे कर्तृत्व उर्जादायी आणि मार्गदर्शक !!

        मराठी भाषा ही या मातीची, या महाराष्ट्राची, येथील मराठी माणसाची  ज्वलंत अस्मिता आहे. त्यामुळे केवळ पोटभरण्यासाठी या भूमीत येऊन येथे नोकरी धंदा व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीयांना येथील भूमिपुत्रांच्या संस्कृतीची, अस्मितांची किंवा प्रतिष्ठेची चाड कुठून असणार? म्हणूनच कुलाबा परिसरातील एका सराफाच्या दुकानात खरेदीसाठी गेलेल्या लेखिका शोभा देशपांडे यांनी त्या परप्रांतीय दुकानदाराकडे मराठी भाषा बोलण्याचा आग्रह धरताच त्याने त्यांना दुकानातून धक्के मारून बाहेर काढले. परंतु शोभाबाईही मर्दानी झाशीची राणी निघाल्या. त्यांनीही त्यादुकानासमोर रात्रंदिवस सुमारे २० तास ठिय्या देऊन अखेरीस त्या सराफास माफी मागण्यास भाग पाडले. शोभाबाई मदतीसाठी कोणत्याही संघटनेची वाट न पाहता एकाकी लढल्या. शोभाबाईंचे हे कर्तृत्व कौतुकास्पद तर आहेच, पण त्याहूनही ते समस्त मराठी जनांस  उर्जादायी आणि मार्गदर्शक आहे.

      अशाच प्रकारे प्रखर लढा देऊन या पोटभरू परप्रांतीयांत आपली संस्कृती आणि आपली मराठी भाषा रुजविणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. असे झाले तरच मराठी भाषेचा विस्तार आणि प्रतिष्ठा वाढून तिचा झेंडा केवळ दिल्लीवरच नव्हे तर अखिल विश्वावर फडकेल.


Batmikar
जेष्ठ पत्रकार - अशोक सावंत

Most Popular News of this Week