@@@पुन्हा नवीन संकल्प @@@
संकल्प दरवर्षी सोडतो, यंदा मात्र पाळायचाय !
न चुकता पहाटे, नाय तर सांजेला, तरी चालायचय !
हो असेल मी थोडासा उद्धट, सौजन्य अंगी बाणवायचय !
झालेत अश्रुचे बर्फ, दिन दुबळ्यांसाठी तरी पाणवायचय !
शब्द हे दुधारी हत्यार, जपूनच जरासे वापरायचय !
पोटात घेता येईल का चुका, माझ मलाच आजमावायचय !
म्हणाल तुम्ही
"हा कसला सुधारतोय, याच असेच चालायचंय !
चांगला कवी सापडेपर्यंत, याला कसे टाळायचंय" !
थांबतो बरे आता, काव्य रबरागत नाही ताणायचय !
समोर तुमच्याच रांगत होतो, आभार तुमचेच मानायचय !
- गजाभाऊ