स्वप्न बहरून यावे.....

स्वप्न बहरून यावे.....

स्वप्न बहरून यावे...

त्यात तुला पाहावे,

पापणीच्या कडेवर ओले

दवबिंदू सजावे...

बंद डोळयांनी तर 

सगळेच बघतात,

उघडया डोळयांनी पण

मन भरून तुलाच पहावे,

माझ्या प्रेमाचे अजून

किती देऊ पुरावे

प्रत्येक श्वासात

फक्त तुलाच जपावे,

तुझ्यावाचून माझ्या कडे

काहीच न उरावे.....


ऑरगॅनिक  झुक्या


Batmikar
बातमीकार

Most Popular News of this Week