कधी वाटते व्हावे !!

कधी वाटते व्हावे !!

         (वार्ताहर - प्रद्युमन देशपांडे)

 कधी वाटते व्हावे

मर्म तुझ्या मनातले..

कधी वाटते व्हावे , 

शब्द तुझ्या ओठातले..! 


कधी मिळावी संधी 

दुःख्खं तुझे होण्याची .

कधी द्यावी संधी 

तू , तुझ्या कंठाने रडण्याची..! 


पुर्णतः परावर्तीत व्हावा मी

कधी मी ' तू ' व्हावं..

तुझ्या जीवनाचे सुख-दुःखं 

मी मना शरिराने अनुभवाव..!! " 


प्रद्युम्न...


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week