
दिवाळीला पेंशनवाढ जाहीर व्हावी !!
देशाच्या इतिहासात प्रथमच शेतकरी शेतमजूर, छोटे दुकानदार, वयाच्या ६० वर्षानंतर नियमित ३ हजार रु निवृत्ती वेतनाची तरतूद सरकारने जाहीर केली आहे. सरकारी कर्मचार्यांना सातवा आयोग जाहीर झाला आहे. तरी खासगी क्षेत्रातील ई पी एस १९९५ चे ७४ लाख पेन्शनर, सन २०१४ रोजी संसदे मध्ये सादर केलेल्या कोशियारी समितीचा अहवाल, सर्वोच्च न्यायालयाने सन २०१६ रोजी दिलेल्या न्यायाप्रमाणे न्याय मागणीची अंमलबजावणी होत नसल्यामुळे गेली ५-६ वर्ष पेंशनर संघटना, धरणे, आंदोलन, प्रत्यक्ष दिल्ली मध्ये मोर्चा काढून आपल्या मागण्या मागत आहेत. कित्येक खासदार संसदेत पेंशनवाढी संबंधी सातत्याने मागणी करत आहेत. सर्वोच न्यायालयाने दिलेल्या निर्णया प्रमाणे, पेंशनर ज्येष्ठ नागरिकांना न्याय आणि सन्मान मिळून देण्यास दिवाळी ला पेन्शनवाढ जाहीर व्हावी.