
विमा परताव्याची मुदत हवी !!
आजकाल सर्व सामान्य नागरीक, अचानक उद्भवणाऱ्या आजारासाठी आणि आता सरकारने काही त्यात साथीचे रोग ही समाविष्ट केले आहेत. त्यामुळे मेडी क्लेम पॉलिसी, शासकिय किव्हा खासगी कंपन्यांकडून घेतात, त्यामुळे रुग्णालयातील उपचाराकरिता बिल भरण्याची सुविधा असते. आयकर सुट ही मिळते. परंतू आता सर्वच खासगी रुग्णालयांमध्ये प्रथम पैसे भरा, नंतरच उपचाराकरिता दाखल करण्यात येते. (कॅशलेस पॉलिसी अपवाद) तरी रुग्णालयातील उपचारानंतर विमा कंपन्यांना पाहिजे ते सर्व कागदपत्रे वेळेवर सादर करुन ही, पैसे बँक खात्यात कसे जमा होतील, याची कोणतीही मुदत विमा कंपनी तर्फे देण्यात येत नाही. तरी परताव्या करीता मुदत देण्यात यावी असा सरकारने निर्णय घ्यावा.