भारतीय अनिमेशनपटाचे पितामह पद्मश्री राममोहन यांचा गौरव व्हावा !!

भारतीय अनिमेशनपटाचे पितामह पद्मश्री राममोहन यांचा गौरव व्हावा !!

        मुंबईत वरळी येथे वास्तव केलेले श्री राममोहन यांचा जन्म १६ ऑगस्ट १९३१ रोजी केरळ येथे झाला. मंगरूळ येथे विज्ञान शाखेत शिक्षण. त्यांना चित्रकलेची आवड होती. ते मुंबईत नोकरीकरीता आले. १९५६ साली मुंबईतील फ्लिम्स डीव्हीजन च्या कार्टून युनिट मध्ये रुजू झाले. तेथे कथा लेखक, लेआउट आर्टिस्ट, ट्रेनी ॲनिमेटर, सिनिअर ॲनिमेटर, स्टोरी बोर्ड आर्टिस्ट म्हणून काम केले. वॉल्ट डिस्नीच्या क्लेअर विक्स ह्यांच्या मार्गदर्शना खाली ॲनिमेशन चे धडे घेतले. त्यांचा पहिला ॲनिमेशनपट द बनियन ट्री १९५७ साली प्रदर्शित झाला. तो जातक कथेवर आधारित होता. फ्लिम डीव्हीजन मध्ये १०दहा वर्षे काम केल्यानंतर प्रसिद्ध सिने निर्माता, दिग्दर्शक श्री. एल, व्ही प्रसाद ह्यांच्या ॲनिमेशन प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये काम केलं. १९७२ साली स्वतःचा राममोहन बायोग्राफिक नावाचा स्टुडिओ सुरु केला. त्यांनी चित्रपटाच्या श्रेयनामावली साठी शतरंज के खिलाडी (सत्यजित रे), पती पत्नी और वो (बी आर चोप्रा), बीवी ओ बीवी (राज कपूर), चष्मे बहाद्दूर (सई परांजपे), तसेच दो और दो पांच, काम चोर इ अनेक चित्रपटांसाठी काम केलं आहे. १९९२ साली युनिसेफ मीना ह्या कार्टून सिरीज साठी काम केले आहे. ॲनिमेशन को- प्रोडक्शन इन एशिया अँड पॅसिफिक कल्चर सेंटर फॉर युनेस्को साठी व्हाईट एलिफंट हा अकरा मिनिटांच्या ॲनिमेशनपटाची निर्मिती केली. त्याचप्रमाणे त्यांनी जपानी ॲनिमेशन निर्माता युगो साको ह्यांच्यासोबत रामायण : द लिजंड ऑफ प्रिन्स राम (१९९२) दिग्दर्शक म्हणून काम केले. आणि अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या "यु सेट इट" आणि "फायर गेम" यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ग्राफिटी मल्टिमीडियासोबत ॲनिमेशन अक्टिव्हिटीज करत असताना यूटीव्हीच्या सहकार्याने नवनवीन व होतकरू तरुणांना ॲनिमेशन क्षेत्रात संधी उपलध्द करून दिल्या.

      देशातील अनिमेशनचे जाळे विणले गेले. अनेक अनिमेशन स्टुडिओ उभे राहिले. या त्यांच्या अफाट कर्तृत्वामुळे परदेशातील अनेक अनिमेशन प्रकल्प आपल्या देशात येऊ लागले. त्यांचे श्रेय राममोहन यांना द्यावे लागेल. अनिमेशन क्षेत्रातील उतुंग कामगिरी बद्दल सन 2014 रोजी मा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. हा आपल्या मुंबईतील नागरिकाला महत्त्वाचा सन्मान म्हणता येईल. त्यांचा मृत्यू दि 11 ऑक्ट 2021 रोजी झाला. त्यांच्या या कर्तृत्वास मानवंदना देण्यासाठी, स्मृती चिरंतन राहण्यासाठी, मुंबई वरळी परिसरात रस्ता, चौकाला नाव देण्यात यावे.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week