
रायगड रोप वेला विरोध !!
रायगडाच्या पवित्र्याला आणि अस्मितेला धक्का पोहचू नये म्हणून रायगड रोप - वेच्या निर्मितीवेळी उभ्या महाराष्ट्रात अस्मिता फक्त एकाच माणसात जागली होती !
रायगडावर रोप वे झाल्यास महाबळेश्वर, माथेरान आणि गोव्याला फिरायला आणि पिकीनीक साठी जाणारे हुल्लडबाज लोक सर्रास रायगडावर येतील, आणि त्याने शिवछत्रपतींच्या रायगडाच्या पावित्र्याला धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा महाराष्ट्रातून कोणी याला विरोध करो वा न करो, मी यासाठी उपोषण करणार म्हणून सामान्य कुटुंबातील एक व्यक्ती मुंबईच्या हुतात्मा चौकासमोर उपोषणाला बसली - नाव अप्पा परब !
हा हा म्हणता या सामान्य व्यक्तीच्या उपोषणाची दखल घेतली गेली. एका बड्या नेत्याने त्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावून घेतले आणि, " रोप वे सारखा अप्रतिम प्रकल्प रायगडावर होत असणारा उपोषण करण्याचे कारण काय " ? याबाबत विचारणा केली.
त्यावर अप्पा म्हटले " छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राष्ट्रपुरुष त्या गडावर चिरनिद्रिस्थ आहे. रायगडावर रोप वे झाल्यास महाबळेश्वर, माथेरान आणि गोव्याला फिरायला आणि पिकीनीक साठी जाणारे हुल्लडबाज लोक सर्रास रायगडावर येतील, आणि त्याने शिवछत्रपतींच्या रायगडाच्या पावित्र्याला धोका निर्माण होऊ शकतो.म्हणून माझा या गोष्टीला कायम विरोध राहील.
त्यावर त्या बड्या नेत्याने विचारलं की " जर रोप वे नसेल आणि आमच्या सारख्या 'साठी' कडे झुकलेल्या वयोवृद्धांना गड किल्ले पहावयाचे झाल्यास मग ते रोप वे अभावी कसे पाहावेत " ?
त्यावर अप्पा नम्रता पूर्वक म्हटले, " साहेब गड - किल्ले हे भर जवानीत पाहावे, 'साठी' नंतर माणसाने काशी - गया - प्रयाग करावे, आयुष्य सरल्यानंतर गड - किल्ले तुम्हाला काय समजणार !
त्यावर त्या नेत्याचे अंगरक्षक आपल्या साहेबांचा या अप्पा परब नामक व्यक्तीने अपमान केला म्हणून त्यांना मारायला धावले,
त्यावर ते सद्गृहस्थ नेते म्हटले - " थांबा, ते बरोबर बोलत आहेत. पण रायगडावर रोप - वे होणार हे नक्की - एवढंच सांगतो !
तुम्ही रजा घ्या !
त्यावर अप्पा ही म्हटले - " मी सामान्य, माझा आवाज दडपला जाणार हे मला ठाऊक आहे, परंतु आयुष्यभर रोप - वेला माझा विरोध कायम राहील साहेब !
आज ते राजकारणातील व्यक्तिमत्व चंद्र सूर्य असे पर्यंत जनसामान्यांच्या मनामनात अमर आहे, आणि अप्पा त्यांच्या कृतीमुळे आमच्या मनात.
आणि आजही वयाच्या ८२व्या वर्षी अप्पा किल्ले रायगड रोप - वेने न चढता पायी चढून जातात. याला म्हणतात 'अस्मिता रक्षणासाठी आपल्या विचारांवर ठाम राहणे' !
नावासाठी, वरवरच्या थातूर मातूर अस्मिता रक्षणाचा वाव आणणारे कित्येक येतात आणि जातात, इतिहास त्यांची कधीही दखल घेत नाही. 'अप्पांसारखा सर्व सामान्य मात्र इतिहासाच्या पानांत याच कृतीमुळे दखल घेण्यास पात्र ठरतो.
" महाराष्ट्रातून असे अनेक सामान्य उभे राहिले, आणि महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना रोप वे का नको - हा विषय सरकार दरबारी पटवून दिला तर 'राजगड' रोप वे ची काय बिशाद "