धुणीया सेठ दो सिगारेट दे दो.. नही तो देख लेंगे !!

धुणीया सेठ दो सिगारेट दे दो.. नही तो देख लेंगे !!

 (वार्ताहर - प्रद्युमन देशपांडे)

किधर है बे तू...? 

क्या कर रहा है ? 

चाय पाणी हो गया ना ? 

बाहर आ जा.. मै धुणीया की दुकान पे आ रहा हुँ । तू भी आ जा  ! 

सदानंद ,  विक्रम ( बदललेली नावे ) ला फोन वरून बोलला . तसा विक्रम ही घरून निघाला .

       रोजच्या नित्य नियमा प्रमाणे मुबारक धुणीया घरातले नित्यकर्म  आवरून दुकानात बसलेले..सकाळची वेळ.

सदानंद विक्रम हे दोघे मित्र ..कमालीचे आळशी ! 

कामधंदा करण्याचा खूप कंटाळा या दोघांना..

नेहमीच खिसा रिकामा असतो यांचा .पण शौकपाणी मौजमजा मात्र कुठल्याही परिस्थितीत सोडत नसत .

      धुणीया सेठ दो सिगारेट दे दो..

विक्रम आणि सदानंद धुणीयाच्या दुकानावर येऊन सिगारेट मागतात..

' चौबीस रू. दे दो ! दो सिगारेट के चौबीस रू. होते है । ' 

धुणीया त्या दोघांना बोलले .

" हाँ भाई समझे हम..पैसा किधर भागे जा रहा है..?  पहले सिगारेट तो दे दो । अभी मेरे पास छुट्टा नही है..कल दे देगा । " सदानंद धुणीयाला बोलला .

' नही भाई..तुम हर बार ऐसा ही करते हो । माल ले जाते और वक्त पे पैसा कहाँ देते हो ? ' 

धुणीया शिकायत स्वरूपात बोलला .

     अरे तो हम कहाँ बंबई छोड के भाग जा रहे है...कल पैसा लौटा देंगे ना ! " विक्रम चढ्या आवाजात बोलून धुणीयाला दम भरण्याचे भाष्य करून गेला .

' आज से ऐसा नही चलेगा भाई..

पैसा दो माल ले लो ' 

धुणीया आपल्या निष्चयावर ठाम होता .

ते दोघे धुणीयाशी वाद घालू लागले . त्यांना त्यांची झालेली अपेक्षाभंग खूपच जिव्हारी वाटली . शिवाय तलब पूर्ण होत नाही म्हणून बैचेन होऊन वाद घालू लागले .

पण धुणीया आपल्या निर्णयावर ठाम होता ! 

जवळपास वीस एक मिनीट दुकाना समोर वाद चालला . धुणीयाने उधारी तुम्हाला मिळणार नाही स्पष्ट सांगितले .

शेवटी..

" उधार देता है की नही सिर्फ इत्ता  ( इतना ) बोल " 

सदानंद ठासून बोलला .

धुणीया स्पष्ट नाही सांगितला ! 

" चल रे..चल यहाँ से ! 

देख लेंगे साले को. . ." 

विक्रम रागाने धुणीया कडे पहात बोलून सदानंद ला घेऊन माघारी परतला .

ते दोघे गेल्यानंतर धुणीया इतर ग्राहकांच्या सेवत मग्न झाले .

दुपार दिड , पावणे दोन च्या सुमारास दुपारच्या जेवणासाठी धुणीया घरी निघाले .

पण , घरी जाताना सदानंद आणि विक्रम यांनी धुणीया शी पुन्हा वाद घालणे चालू केले..

बाचाबाची नंतर  शेवटी प्रकरण  मारहाणीवर आले . ते दोघे ही धुणीयाला मारू लागले .

त्या दोघांचा मारहाण करण्याचा पूर्वनियोजित कट ठरलेला होता..

मारहाणी साठी त्यांनी लाकडी बांबू आणि क्रिकेट खेळण्याची बॕट आणली होती.

बॕट ने आणि बांबू ने दोघांनीही धुणीया ला बेदम मारहाण केली .धुण्यायाच्या मानेवर आणि डोक्यात सदानंद आणि विक्रम यांनी बॕट ने कैक प्रहार केले . आणि तिथून निघून गेले...

महा प्रयासाने तथा इतराच्या मदतीने मुबारक धुणीया वय वर्ष ४६ रहाणार बी नं ८सी रुम नं ०१  , नटवर पारेख कंपाउंड , म्हाडा काॕलनी , शिवाजी नगर गोवंडी , मुंबई . यांना मुलाने दवाखान्यात पुढील उपचारासाठी घेऊन गेले.

     सदर घटनेची  दि. १४ . ०६ . २०२२ रोजी दुपारी ०२ . ०० च्या सुमारास मुबारकअली धुणीया यांचा मुलगा , तरबेज मुबारकअली धुणीया वय वर्ष १७ रहाणार ठिकाण बी नं ८सी  , रुम नं ०१ , नटवर पारेख कंपाउंड ,  म्हाडा काॕलनी , शिवाजी नगर गोवंडी , मुंबई  यांनी तक्रार दिल्या नंतर गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक ३०९ / २२ प्रमाणे कलम ३०७ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ अन्वये रितसर गुन्हा नोंदवून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली .


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week