कुलाबा येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करून परदेशी महिला नागरिकाची चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करून परदेशी महिलेला पुन्हा सपूर्त केली !!

कुलाबा येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करून परदेशी महिला नागरिकाची चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करून परदेशी महिलेला पुन्हा सपूर्त केली !!

      फिर्यादी श्रीमती रहिमा सलीम आलवर्दी वय वर्षे ४७ ही टांझेनिया देशातील नागरिक असून ती त्यांचे पती कुटुंबीयासह कामानिमित्त मुंबईस आले असता, दिनांक १/६/०२३ रोजी रात्री नऊच्या सुमारास हॉटेल ताज पॅलेसचा मागील रोड, कुलाबा येथे एका अनोळखी इसमाने त्यांच्या गळ्यातील काळ्या रंगाची पर्स हिसकावून मोटर सायकल वर बसून पळून गेले होते. म्हणून फिर्यादीने कुलाबा पोलीस ठाणे रिपोर्ट केला होता. त्यामुळे कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

          सदर गुन्ह्याच्या तपासा अंतर्गत घटनास्थळावरून फुटेज मिळाले होते. मिळालेल्या गुप्त बातमीवरून (१) मोहम्मद अफराद वरजुद्दीन चौधरी, वय वर्ष २६ (२) सैफ रजाक खान, वय वर्ष २२ (३) फहीम आयाज शेख, वय वर्ष २१ या तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण २,३७,६०० रू व २२०० अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनातील किंमत) १,९५,८०० रू व आयफोन १४ प्रो मोबाईल किंमत ७०,००० असा एकूण ४,०३,४०० रुपयांचा मुद्देमाल पोलीस आयुक्त परिमंडळ-१ यांच्या हस्ते फिर्यादी महिला श्रीमती रहिमा सालीम आलवर्दी यांना दिनांक १३/९/०२३ रोजी सुपूर्त करण्यात आला.

           सदरची कामगिरी डॉक्टर अभिनव देशमुख अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई व डॉक्टर प्रवीण मुंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१ मुंबई व श्री शशिकिरण काशीद सहाय्यक पोलीस आयुक्त कुलाबा व विजय हातिसकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कुलाबा पोलीस ठाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल वाघ व पोलीस हवालदार मोहिते, पोलीस शिपाई भोसले, अत्रे, पोलीस शिपाई पूरे या पथकाने केली आहे.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी