
बी.जी. किणी स्कुल उमेळमान तालुका वसई ह्या शाळेत वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न !
बी.जी. किणी स्कुल उमेळमान तालुका वसई ह्या शाळेत वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न !
दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त उमेळमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था तालुका वसई ह्या संस्थेतर्फे आगरी समाज विकास शिक्षणं संस्था बी.जी.किणी स्कुल उमेळमान तालुका वसई ह्या शाळेत वृक्षरोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेश पाटील, सल्लागार श्री भुलेश पाटील, नगरसेवक श्री सचीन घरत यांच्या हस्ते बी.जी.किणी स्कूलचे ट्रस्टी श्री मदन किणी व सेक्रेटरी श्री विजय किणी याचे हातात शोभेची ५० झाडे सुपूर्द करण्यात आली. बी.जी.स्कूल ही वसईतील नावाजलेल्या इंग्रजी माध्यम शाळा पैकी एक शाळा आहे. ह्या शाळेत काँनव्हेंट सारखी शिक्षण पद्धत आहे, इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या पदवीधर शिक्षिका आहेत. शिक्षकांच्या मदतीने शाळेचा निकाल दरवर्षी शंभर टक्के लागतो असे शाळेचे ट्रस्टी मदन किणी यांनी माहिती देताना सांगितले.
उमेळमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था ही वसई तालुक्यात सामाजिक कार्यास नेहमीच तत्पर असते. संस्थेतर्फे दरवर्षी जिल्हा क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. असे संस्थेचे सल्लागार श्री भुलेश पाटील यांनी माहिती देताना सांगितले. कार्यक्रमा अंतर्गत उमेळमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेश पाटील, सल्ला गार भुलेश पाटील, कार्याध्यक्ष नगरसेवक सचिन घरत, उपाध्यक्ष किरण पाटील, सेक्रेटरी भरत पाटील, खजिनदार विश्वनाथ पाटील, तसेच प्रकाश पाटील, पूर्वेश घरत, दिपक घरत तसेच बी.जी.स्कूलचे ट्रस्टी मदन किणी सेक्रेटरी विजय किणी, उपाध्यक्ष भालचंद्र घरत, बी.जी.किणी स्कूलच्या प्रिन्सिपल सौ. सारिका धर्मेंद्र म्हात्रे, शाळेचा शिक्षक वर्ग ऑफीस स्टाफ, ९वी १०वी च्या विध्यार्थ्यांसहीत इतर मान्यवर उपस्थित होते.