खुनी कोण ?? नायगाव खारफुटी जंगलात हत्या ??

खुनी कोण ?? नायगाव खारफुटी जंगलात हत्या ??

       वसई तालुक्यातील नायगाव येथील खारफुटी जंगलात एका ४७ वर्षीय इसमाची हत्या करण्यात आली असून, याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की नायगाव येथील खारफुटी जंगलात एका इसमाचा मृतदेह सापडला असल्याची खबर नायगाव पोलिसांना मिळताच, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची तपासणी केली असता, त्या मृतदेहाच्या जवळ सापडून आलेल्या चीज, वस्तू यावरून मयत इसमाचे नाव भगोती उतेकर असे आहे. त्याचे वय ४७ वर्षे असून नालासोपारा येथे राहत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यावरून पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधून शवाची ओळख पटवून घेतली आहे. पंचनामा करताना शवाच्या छातीवर व गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही हत्या असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेच्या खुनाचा गुन्हा नायगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे.     

         या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केलेली आहेत. ही हत्या ह्याच भागात झालेली आहे की ही हत्या दुसरीकडे करून मृतदेह खारफुटी जंगलात फेकून दिला, याचा खुलासा उलगड्या नंतर स्पष्ट होणार आहे. तूर्तास या घटनेमुळे नायगाव परिसरात एकच खळबळ उडालेली आहे, ती हत्या कोणी केली ?


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी