
लाखो रुपयांची चोरी करणारे आरोपींना गुजरात मधून अटक !!
लाखो रुपयांची चोरी करणारे आरोपींना गुजरात मधून अटक !!
वसईतील एका कंपनीची लाखो रुपयांची बॅग गाडीतून पळविणाऱ्या आरोपिना गुजरात येथील सुरेंद्रनगर येथून अटक करण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या आरोपीकडून तीन गुन्ह्याची उकल करून चोरी केलेल्या रकमेपैकी नऊ लाख पाच हजारांची रोख रक्कम हस्तगत केली आहे. ही माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बंन गोसावी यांनी दिली. १४ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता सलमान सुपारी स्टोअर्स ते रेंज नाका सिग्नल दरम्यान उत्तम वजाळ वय (२९) वर्ष हे काम करत असलेल्या जितेंद्र कॉर्पोरेशन कंपनीची पंधरा लाख ९९ हजार १३३ रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग गाडीच्या पाठीमागे कुलूप लावून ठेवली होती.
चोरट्याने गाडीच्या पाठीमागील कुलूप तोडून रोख रक्कम असलेली बॅग चोरून नेली होती. या प्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई परिसरामध्ये वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यास मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने व तांत्रिक बाबींच्या मदतीने आरोपींना निष्पन्न केले. आरोपी निलेश उर्फ पोया धरमशी बुटीया वय ३६ वर्ष, दिलीप उर्फ कालिया करसन भोगिया वय २८ वर्ष आणि भरत उर्फ मिडीया चिरू बुटिया या तिघांना गुजरात राज्यातील सुरेंद्रनगर येथून अटक करण्यात आली.
आरोपींनी अशा प्रकारचे अनेक गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. आरोपीकडून गुन्ह्यात चोरी केलेल्या रकमेपैकी नऊ लाख पाचहजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. वरील कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले श्रिंगी, सहायक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील, वालिवचे पोलीस निरीक्षक जयराज रणरवे, पोलीस निरीक्षक गुन्हे जिलानी सैय्यद यांच्या मार्गद्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, किरण सचिन गांगुर्डे, बाळू कुटे, अभिजीत गदरी यांनी केली.