
छोटा राजन टोळीतील गुंडाला अग्निशस्त्रासह केली अटक !!
छोटा राजन टोळीतील गुंडाला अग्निशस्त्रासह केली अटक !!
दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी छोट्या राजनच्या टोळीतील गुंडास अटक करण्यात आली. छोट्या राजनच्या टोळीतील गुंड श्याम पांडुरंग तांबे उर्फ सँव्हियो रॉड्रिक्स हा कृष्णा हॉटेल जिजामाता नगर वरळी येथे अग्निशस्त्र (पिस्टल) सह येणार असल्याची माहिती कक्ष तीन गुन्हे प्रकटीकरण शाखा यांना मिळाली होती. मुंबई पोलिसांनी सापळा रचून नमूद गुंडास शिताफीने ताब्यात घेतले. त्याला अटक केली असता त्याच्याजवळ अग्निशस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
त्याच्याजवळ असलेले अग्निशस्त्र व काडतुसे जप्त करून श्याम पांडुरंग तांबे सँव्हियो रॉड्रिक्स वय ४२ वर्ष कामधंदा काही नसलेला, राहणार वीर जिजामाता नगर, वरळी, मुंबई १८ याच्या विरुद्ध गुन्हे प्रकटीकरण शाखा व गुन्हे अन्वेषण विभाग, यांच्या कडून भारतीय दंड विधान कलम, ३,२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
नमूद गुन्ह्यात आरोपीस अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी हा गॅंगस्टर छोटा राजन टोळीचा सदस्य असून त्याच्या विरुद्ध मुंबईच्या पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, दरोडा, बेकायदेशीर अग्निशस्त्र (पिस्टल) बाळगणे अशा विविध गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. गुन्ह्याचा तपास कक्ष ३ कडून करण्यात येत असून गुन्हा प्रकटीकरण शाखा व गुन्हे अन्वेषण विभाग यांनी श्याम पांडुरंग तांबे याला अटक करून भविष्यात होणाऱ्या गंभीर अपराधांना प्रतिबंध करण्यात यश मिळविले आहे .
सदरची यशस्वी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री विवेक फणसळकर, माननीय श्री विशेष पोलीस आयुक्त बृहन्मुंबई श्री देवेन भारती, माननीय पोलीस सह आयुक्त श्री लखमी गौतम, माननीय अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शाशिकुमार मीना, माननीय पोलीस उपआयुक्त (प्रकटीकरण) श्री दत्ता नलावडे, माननीय सहायक पोलीस आयुक्त प्रकटीकरण (मध्य) श्री चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे, पोलीस निरीक्षक शामराव पाटील, पोलीस हवालदार आकाश मांगले, पोलीस हवालदार राहुल अनभुले, सुहास कांबळे, भास्कर गायकवाड, पोलीस हवालदार शिवाजी जाधव यांनी यशस्वी पार पाडली.