अपहरणासह जबरी चोरी करणा-या ०६ आरोपींना मुंबई व गोव्यातून अवघ्या ०६ तासात अटक !!

अपहरणासह जबरी चोरी करणा-या ०६ आरोपींना मुंबई व गोव्यातून अवघ्या ०६ तासात अटक !!

           श्री. श्रदण लक्ष्मण रावल, वय ४५ वर्षे, विरार पश्चिम जिल्हा पालघर हे तक्रारदार फिर्यादी अॅन्टॉप हिल, येथून पायी जात असताना ४ अनोळखी इसमांनी त्यांना चारचाकी वाहनामध्ये जबरदस्तीने घेवुन जावुन त्यांना धमकी देवून त्यांच्या ताब्यातील ३२,५०,०००/- रू. रोख रक्कम काढून घेवुन त्याला घाटकोपर परीसरात सोडुन दिले.

         म्हणून श्री रावल यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात, गु.र. क. २२६/२६ कलम १३७ (२), ३०९ (२), ३ (५) भा. न्या. संहिता अन्वये दरोड्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

      नमुद गुन्हा अतिशय क्लिष्ट असल्याने व गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने कोणतेही धागेदोरे प्राप्त होत नसल्याने सदर तक्रारदार व आरोपी काम करत असलेल्या कंपनीमधुन मागील १ वर्षामध्ये नोकरी सोडून गेलेल्या ८ लोकांच्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून एका संशयीत इसमाची माहिती प्राप्त केली. सदर इसमास गुप्त बातमीदाराच्या मदतीने चेंबुर परीसरातुन ताब्यात घेतले व त्याच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने व त्याच्या इतर ०७ साथीरांनी मिळून नमुद गुन्हा केला असल्याची कबुली दिली.

       नमुद गुन्हयात आतापर्यंत एकुण ६ आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांची नावे १) राहूल एकनाथ गायकवाड, वय ३० वर्षे, २) इरफान अली अहमद अली खान वय ३३ वर्षे, ३) विवेक विलास काकडे वय ३२ वर्षे, ४) संतोष वसंत मलेकर वय ४४ वर्षे, ५) स्वप्नील चंद्रकांत पाटील वय ३४ वर्षे, व ६) मोहम्मद रिजवान अन्सार, वय ४१ वर्षे अशी आहेत.

        त्यापैकी आरोपी क्रमांक २ याला नालासोपारा, आरोपी क्रमांक ३ यास गोवा राज्य, आरोपी क्रमांक १ यास नेहरूनगर कुर्ला मुंबई याठिकाणा वरुन अटक केली असुन त्यांच्याकडून एकुण रोख रक्कम २९,६९,०००/- रु. चा मुदद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

          सदरची उत्कृष्ट कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त श्री. सत्यनारायण चौधरी (कायदा व सुव्यवस्था), अप्पर पोलीस आयुक्त श्री. विक्रम देशमाने (मध्य प्रादेशिक विभाग), पोलीस उप आयुक्त श्रीमती रागसुधा आर, (परिमंडळ ४), सहा. पोलीस आयुक्त श्री. सुहास कांबळे (सायन विभाग), यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पावडे, पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले (गुन्हे), पोलीस निरीक्षक समीर कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, शिवाजी मदने, प्रदिप पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोनवलकर, पोलीस हवालदार गस्ते, टेळे, ठोके, पोलीस शिपाई ठाकुर, पाटील, आमदे, बाबर, माने, विसपुते, माने, किरतकर, राजगणे, यांनी पार पाडली आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे