मुंबईतील गोरेगाव विभागातील जुगाराचा अड्डा बंद कधी होणार ?

मुंबईतील गोरेगाव विभागातील जुगाराचा अड्डा बंद कधी होणार ?

     गोरेगाव मुंबई : गोरगरीब लोक पैशांच्या आवश्यकतेसाठी जुगाराच्या दिशेने वळताना दिसतात, जुगार खेळणाऱ्या लोकांच्या परिवाराचे जीवन उध्वस्त होत आहे. त्या लोकांची घराची आर्थिक परिस्थिती खराब असून त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागतो.

     यापूर्वी विधानसभेत अशा अनधिकृत लॉटरी वरती अनेक आमदारांनी प्रश्न उपस्थित केले होते.

        अशातच प्राप्त माहितीनुसार मुंबईतील गोरेगाव विभागात, गोरेगाव पोलीस स्टेशन, मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत कैलास अपार्टमेंट, जॉन प्लेयर कपड्याच्या दुकानाच्या बाजूला, युनियन बँकेच्या शेजारी, फिल्मिस्तान स्टुडिओच्या समोर, एस वी रोड गोरेगाव पश्चिम येथे मॅनेजर वकील सिंग, अजय शर्मा त्यांचे मालक प्राप्त माहितीनुसार (गणेश शेट्टी), यांचा जुगाराचा लॉटरीचा अड्डा आहे.

     त्या ठिकाणी शेकडो जुगारी आपल्या मेहनतीचे पगाराचे पैसे लावण्यासाठी कधीकधी कर्ज काढून जुगार लावण्यासाठी या ठिकाणी येतात.

          हा जुगाराचा अड्डा खुलेआम राजरोसपणे मोठ्या प्रमाणात चालवला जात आहे. चालवणाऱ्यांच्या मनात पोलीस प्रशासनाबद्दल कोणतीही भीती नसल्याचे जाणवत आहे. भर रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी दुकान थाटून खुलेआम हा जुगार चालवला जात आहे. दाखवण्यापुरता बाहेर कालबाह्य राजश्री लॉटरी चा बॅनर लावलेला आहे.

        यापूर्वी बातमीकारने मुंबई पोलीस कंट्रोल रूमला तक्रार क्रमांक (CFS37062056) द्वारे याबाबत कळवले होते. परंतु कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

          यांच्या जुगाराच्या अड्ड्यावरती गोरेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सूर्यकांत खरात


   

       तसेच उपायुक्त परिमंडळ 11 कायदेशीर कारवाई कधी करणार, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी कधी होणार ? यांच्या पाठीवर नेमका कोणाचा हात आहे असा प्रश्न स्थानिक रहिवाशी विचारत आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांकडून अधिकची माहिती घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, त्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.


           अभिषेक बाबाजी शिंदे.

              (संपादक- बातमीकार)

                  डिजिटल वृत्तपत्र

            www.batmikar.com

     Mobile - 9987676699


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे